आणखी चौघांचा मृत्यू, २०३ कोरोना पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2021 04:17 AM2021-04-06T04:17:44+5:302021-04-06T04:17:44+5:30
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून सोमवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे १,१२७ अहवाल प्राप्त झाले. यांपैकी ११९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित ...
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून सोमवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे १,१२७ अहवाल प्राप्त झाले. यांपैकी ११९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित १,००८ अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये पातूर येथील १८, बाळापूर येथील १२, तेल्हारा व डाबकी रोड येथील प्रत्येकी सहा, पतखेड ता. बार्शीटाकळी येथील पाच, जठारपेठ व पारस येथील प्रत्येकी चार, अकोट येथील तीन, टिटवा ता. बार्शीटाकळी, भगीरथ नगर, खडकी, गोरक्षण रोड, मोठी उमरी, जीएमसी, सुधीर कॉलनी, सोपीनाथ व कौलखेड येथील प्रत्येकी दोन, सुकळी ता. बार्शीटाकळी, कान्हेरी सरप ता. बार्शीटाकळी, सहित ता. बार्शीटाकळी, मुर्तिजापूर, जुने शहर, हातरुण ता.बाळापूर, मालेगाव बाजार, रुईखेड, शिवपूर, मुकुंद नगर, ग्रामपंचायत अकोला, खदान, अयोध्या नगर, लोणी, शिवर, शंकर नगर, रामदासपेठ, तापडिया नगर, देशमुख फैल, एमआयडीसी, नायगाव, मंगलवारा, जवाहर नगर, भौरद, चोहट्टा बाजार, संताजी नगर, खोलेश्वर, चांदूर, शिवचरण पेठ, गाडगे नगर, सहकार नगर, कपिला नगर, कुरुम, बार्शीटाकळी, जैन चौक, शांती नगर, अडगाव ता. अकोट, सिंधी कॅम्प, पंचशील नगर, गाडेगाव ता. पातूर, मलकापूर, केळकर हॉस्पिटल, म्हैसपूर येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.
दोन पुरुषांचा मृत्यू
गोलखेडी ता. मुर्तिजापूर येथील ७१ वर्षीय पुरुष व ऐळवन ता. बार्शीटाकळी येथील ४९ वर्षीय पुरुष अशा दोघांचा सोमवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. दोघांनाही अनुक्रमे २९ मार्च व २ एप्रिल रोजी दाखल करण्यात आले होते. सायंकाळी अकोट फैल, अकोला येथील ६५ वर्षीय पुरुष व पातूर येथील ७० वर्षीय महिला या दोघांचा मृत्यू झाला. दोघांनाही अनुक्रमे २ एप्रिल व ३० मार्च रोजी दाखल करण्यात आले होते.
५७८ जणांना डिस्चार्ज
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून १७, कोविड केअर सेंटर अकोट येथील दोन, युनिक हॉस्पिटल येथील एक, देवसार हॉस्पिटल येथील सात, अकोला ॲक्सिडेंट येथील दोन, आयकॉन हॉस्पिटल येथील एक, कोविड केअर सेंटर तेल्हारा येथील दोन, युनिक हॉस्पिटल येथील दोन, कोविड केअर सेंटर बार्शीटाकळी येथील एक, बाॅईज होस्टेल येथील नऊ, नवजीवन हॉस्पिटल येथील एक, आयुर्वेदिक हॉस्पिटल येथील दोन, बिहाडे हॉस्पिटल येथील सात, ओझोन हॉस्पिटल येथील तीन, सूर्यचंद्र हॉस्पिटल येथील दोन, हॉटेल रिजेन्सी येथील सहा, हॉटेल स्कायलार्क येथील तीन, तर होम आयसोलेशन येथील ५१० अशा एकूण ५७८ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
३,९५७ ॲक्टिव्ह रुग्ण
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण २९,०३४ जणांना कोरोनाची लागण झाली असून, त्यांपैकी तब्बल २४,६०३ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ४७० जणांचा मृत्यू झाला असून, सद्य:स्थितीत ३,९५७ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.