आणखी चौघांचा मृत्यू, २६१ पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 04:19 AM2021-04-07T04:19:34+5:302021-04-07T04:19:34+5:30
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून मंगळवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे ११४९ अहवाल प्राप्त झाले. यापैकी १५७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित ...
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून मंगळवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे ११४९ अहवाल प्राप्त झाले. यापैकी १५७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित ९९२ अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये अकोट येथील नऊ, महागाव बु., जठारपेठ, मलकापूर, कौलखेड व मूर्तिजापूर येथील प्रत्येकी पाच, मोठी उमरी, लहान उमरी, गुडदी रोड येथील प्रत्येकी चार, जुने शहर, सिंधी कॅम्प, खोलेश्वर, राऊतवाडी, सुकोडा, रतनलाल प्लॉट येथील प्रत्येकी तीन, चिखलगाव, दक्षतानगर, हिंगणा रोड, वाशिम बायपास, डाबकी रोड, पीकेव्ही क्वार्टर, खडकी, गजानननगर, बाळापूर, जीएमसी आणि दाताळा येथील प्रत्येकी दोन, तर अंतरी, मांजरी, राधेनगर, बेलखेड, गोरक्षण रोड, शंकरनगर, नकाशी, कीर्तीनगर, खीरपुरी खु., मोहम्मद अली रोड, माधवनगर, सेलूबाजार, जवाहरनगर, गंगानगर, सुधीर कॉलनी, मनकर्णा प्लॉट, रेल, तुकाराम चौक, मुकुंदनगर, सस्ती, आलेगाव, टिळक रोड, तोष्णीवाल लेआऊट, गायत्रीनगर, रुईखेड, दानापूर, चोहोट्टा, डेवडा, उरळ, केशवनगर, न्यू खेताननगर, पहूरजिरा, रणपिसेनगर, हातगाव, लंघापूर, कंजरा, माना, शिवनी, मनबदा, गीतानगर, पारस, चतारी, बोरगाव मंजू येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.
सायंकाळी गीतानगर, कमलानगर, शिवनी, शिवापूर, गोरक्षण रोड आणि कपिलवस्तूनगर येथील प्रत्येकी दोन, रघुवीरनगर, भौरद, टीटीएन कॉलेज, पारडी, मलकापूर, बोरगाव मंजू, कृषीनगर, अकोली जहागीर, केशवनगर, यशवंतनगर, जीएमसी, खडकी, शिर्ला, विवरा, पातूर आणि दताळा येथील प्रत्येकी एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला.
चौघांचा मृत्यू
देवरावबाबा चाळ, अकोला येथील ६३ वर्षीय महिला व डाबकी रोड येथील ६२ वर्षीय पुरुष, अकोट येथील ६२ वर्षीय पुरुष व बाळापूर येथील ६० वर्षीय पुरुष, अशा चौघांचा मंगळवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. चौघांनाही अनुक्रमे ५ एप्रिल, २७ मार्च, २ एप्रिल व १ एप्रिल रोजी उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.
३८७ जणांना डिस्चार्ज
आयकॉन हॉस्पिटल येथून तीन, कोविड केअर सेंटर बार्शीटाकळी दोन, सहारा हॉस्पिटल तीन, आरकेटी आयुर्वेदिक कॉलेज एक, बॉइज होस्टेल दोन, हार्मनी हॉस्पिटल एक, अवघाटे हॉस्पिटल एक, बिडाडे हॉस्पिटल आठ, नवजीवन हॉस्पिटल आठ, ओझोन हॉस्पिटल दोन, सूर्यचंद्र हॉस्पिटल चार, अकोला ॲक्सिडेंट हॉस्पिटल चार, हॉटेल रिजेन्सी चार, आधार हॉस्पिटल मूर्तिजापूर दोन, स्कायलार्क हॉटेल तीन, इंदिरा हॉस्पिटल दोन, अकोट कोविड केअर सेंटर येथील दोन, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून २५, तर होम आयसोलेशनमधील ३१०, अशा एकूण ३८७ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
३,८२७ ॲक्टिव्ह रुग्ण
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण २९,२९५ जणांना कोरोनाची लागण झाली असून, त्यापैकी तब्बल २४,९९० रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ४७८ जणांचा मृत्यू झाला असून, सद्य:स्थितीत ३,८२७ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.