आणखी चौघांचा मृत्यू, ४७६ नव्याने पॉझिटिव्ह, २२७ कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 04:17 AM2021-03-28T04:17:44+5:302021-03-28T04:17:44+5:30
सायंकाळी बाळापूर येथील १०, पळसखेड येथील सहा, मुर्तिजापूर येथील पाच, अंतरी बु. व पातूर येथील प्रत्येकी चार, नया ...
सायंकाळी बाळापूर येथील १०, पळसखेड येथील सहा, मुर्तिजापूर येथील पाच, अंतरी बु. व पातूर येथील प्रत्येकी चार, नया अंदुरा येथील तीन, नंदापूर ता. मुर्तिजापूर येथील दोन, गायगाव, निंबा, खडकी, खानापूर ता. पातूर व अंभोरा ता. मुर्तिजापूर येथील प्रत्येकी एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला.
एक महिला, तीन पुरुष दगावले
कोरोनावर उपचार सुरू असलेल्या तेल्हारा येथील ५५ वर्षीय पुरुष, लहान उमरी, अकोला येथील ७० वर्षीय पुरुष, अकोली जहागीर ता. मुर्तिजापूर येथील ७४ वर्षीय महिला व जुने शहर, अकोला येथील ६९ वर्षीय पुरुष अशा चौघांचा शनिवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. चौघांनाही अनुक्रमे, १६ मार्च, २६ मार्च, २३ मार्च व २२ मार्च रोजी दाखल करण्यात आले होते.
६,६४६ ॲक्टिव्ह रुग्ण
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण २६,८२४ जणांना कोरोनाची लागण झाली असून, त्यापैकी तब्बल १९,७३५ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ४४३ जणांचा मृत्यू झाला असून, सद्य:स्थितीत ६,६४६ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.