विवाहितेच्या छळप्रकरणी पतीसह चौघांवर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2020 09:23 AM2020-09-28T09:23:58+5:302020-09-28T09:24:14+5:30
आळंदा (रुस्तमाबाद) ता. बार्शीटाकळी येथील चार आरोपींविरुद्ध रविवारी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
तेल्हारा : गत सव्वादोन वर्षांपूर्वी विवाहबद्ध झालेल्या तेल्हारा तालुक्यातील वाडी अदमपूर माहेर असलेल्या २१ वर्षीय विवाहितेचा प्लॉट घेण्यासाठी १ लाख रुपये आणण्याचा तगादा लावून सासरच्या लोकांकडून शारीरिक व मानसिक छळ होत आहे. तसेच जीवे मारण्याची धमकी देत आहेत. याप्रकरणी आळंदा (रुस्तमाबाद) ता. बार्शीटाकळी येथील चार आरोपींविरुद्ध रविवारी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
आरोपी पती रवी दिगांबर खाडे (२६), सासरा डिगांबर शिवराम खाडे (५८), सासू अरुणा दिगांबर खाडे, दीर श्याम दिगांबर खाडे, रा. आळंदा (रुस्तमाबाद) यांनी २१ वर्षीय विवाहितेस प्लॉट विकत घेण्यासाठी माहेरवरून १ लाख रुपये आण्याचा तगादा लावला. त्यासाठी शारीरिक, मानसिक छळ केला. वरील प्रकरणी फिर्यादीने भरोसा सेल अकोला महिला तक्रार निवारण कक्षाकडे तक्रार केली होती. भरोसा सेलकडून या प्रकरणी आलेल्या अभिप्रयावरून पोलीस निरीक्षक विकास देवरे यांच्या आदेशावरून उपरोक्त आरोपींविरुद्ध २७ सप्टेंबर रोज भादंवि ४९८ अ, ३२३, ५०४, ५०६, ३४ कलमान्वे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीस एक मुलगी आहे. ९ मे रोजी सकाळी ७ वाजता पतीसह नमूद आरोपींनी १ लाख रुपये महेरून आणावेत म्हणून मारहाण केली होती. घटस्फोटाची मागणी केली होती. घरात राहिल्यास हातपाय तोडण्याची व जीवे मारण्याची धमकी दिली होती. घराबाहेर काढले होते, असे तक्रारीत फिर्यादीने नमूद केले आहे. पुढील तपास एनपीसी वासुदेव ठोसरे करीत आहेत.