अकोला मार्गे धावणाऱ्या हमसफर एक्स्प्रेसच्या चार फेऱ्या रद्द; नागरिकांच्या अडचणीत वाढ
By Atul.jaiswal | Published: November 30, 2023 01:30 PM2023-11-30T13:30:08+5:302023-11-30T13:31:07+5:30
अतुल जयस्वाल, अकोला : उत्तर रेल्वेच्या आग्रा विभागातील पलवल-मथुरा सेक्शनवरील मथुरा स्टेशनवर २७ नोव्हेंबर ते ६ फेब्रुवारी २०२४ या ...
अतुल जयस्वाल, अकोला: उत्तर रेल्वेच्या आग्रा विभागातील पलवल-मथुरा सेक्शनवरील मथुरा स्टेशनवर २७ नोव्हेंबर ते ६ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत अनेक गाड्या तात्पुरत्या रद्द, शॉर्ट-टर्मिनेशन, डायव्हर्ट केल्या जाणार आहेत. यामध्ये अकोला मार्गे धावणाऱ्या हमसफर एक्स्प्रेसच्या चार फेऱ्यांचाही समावेश असल्याने अकोलेकरांना अडचणीचा सामना करावा लागणार आहे.
दक्षिण मध्य रेल्वेकडून जारी करण्यात आलेल्या माहितीनुसार, गाडी क्र. १२७५१ हुजूर साहिब नांदेड-जम्मू तावी हमसफर एक्स्प्रेस २६ जानेवारी २०२४ व २ फेब्रुवारी २०२४ रोजी रद्द करण्यात आली आहे. तर गाडी क्र. १२७५२ जम्मू तावी-हुजूर साहिब नांदेड हमसफर एक्स्प्रेस २८ जानेवारी २०२४ व ४ फेब्रुवारी २०२४ रोजी प्रस्थान स्थानकावरून धावणार नसल्याचे सांगण्यात आले आहे.
मुंबई ते नागपूर वन वे स्पेशल शनिवारी
प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते नागपूर दरम्यान शनिवार, २ डिसेंबर रोजी एकमार्गी विशेष गाडी चालविण्याचा निर्णय घेतला आहे. ०२१०३ मुंबई-नागपूर विशेष गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून शनिवार, २ डिसेंबर रोजी पहाटे ००.२० वाजता सुटेल आणि नागपूर येथे त्याच दिवशी १५.३२ वाजता पोहोचेल. ही गाडी अकोला स्थानकावर सकाळी १०:२७ वाजता येणार आहे. एकूण १७ डब्यांच्या या गाडीला दादर, ठाणे, कल्याण, नाशिक रोड, मनमाड, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मुर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव, वर्धा या ठिकाणी थांबा असणार आहे.