बोदखेड शेतशिवारातून चंदनाची चार झाडे चोरीला

By नितिन गव्हाळे | Published: June 27, 2023 06:32 PM2023-06-27T18:32:20+5:302023-06-27T18:32:36+5:30

बोदखेड शेतशिवारातील एका शेतकऱ्याने शेताच्या बांधावर लावलेली चार चंदनाची झाडे अज्ञात चोरट्यांनी शनिवारी लंपास केल्याची घटना घडली.

Four sandalwood trees were stolen from Bodkhed Shetshiwar | बोदखेड शेतशिवारातून चंदनाची चार झाडे चोरीला

बोदखेड शेतशिवारातून चंदनाची चार झाडे चोरीला

googlenewsNext

अकोला : बोदखेड शेतशिवारातील एका शेतकऱ्याने शेताच्या बांधावर लावलेली चार चंदनाची झाडे अज्ञात चोरट्यांनी शनिवारी लंपास केल्याची घटना घडली. या प्रकरणात बार्शीटाकळी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. सुकळी येथील शेतकरी खरावतसिंग बाबूलालसिंग चरावंडे (वय ४२) यांच्या तक्रारीनुसार त्यांनी शेताच्या बांधावर अनेक चंदनाची झाडे लावली होती. 

या झाडांची ते देखभाल करीत. २३ जून रोजी रात्री मजुरांसोबत त्यांचा पुतण्या शेतात झोपायला गेला होता. दरम्यान, त्याला काही लोकांची हालचाल दिसून आली. त्यांनी त्याकडे धाव घेतली असता, तीन-चार चोरट्यांनी पळ काढला. त्यानंतर आम्ही शेताच्या बांधावरील चंदनाच्या झाडांची पाहणी केली असता, चार झाडे तोडून नेलेली आढळून आली. या चंदनाच्या झाडांची किंमत २० हजार रुपये आहे. या प्रकरणात बार्शीटाकळी पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

Web Title: Four sandalwood trees were stolen from Bodkhed Shetshiwar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.