पोरबंदर, शालीमारसाठी चार विशेष पार्सल गाड्या धावणार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2020 05:01 PM2020-04-15T17:01:07+5:302020-04-15T17:01:14+5:30
पोरबंदर व शालीमारसाठी चार विशेष पार्सल गाड्या धावणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.
अकोला : कोरोनाचा दुष्प्रभाव रोखण्यासाठी लॉकडाउन झाले असले तरी आवश्यक साधन सामग्री वहन करण्यासाठी रेल्वेची विशेष पार्सल गाडी सातत्याने धावत आहे. पोरबंदर व शालीमारसाठी चार विशेष पार्सल गाड्या धावणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे. ज्या लोकांना ज्या काही वस्तू पाठवायच्या असतील तर त्यांनी आपल्या जवळच्या स्टेशनमध्ये मुख्य पार्सल पर्यवेक्षक यांच्याकडे संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
पोरबंदर शालीमार विशेष पार्सल गाडी १८,२०,२२,२४ एप्रिलला पोरबंदर स्टेशनहून सकाळी ८ वाजता प्रस्थान करून तिसऱ्या दिवशी रात्री १.३० वाजता शालीमार स्टेशनला पोहोचेल.
गाडी क्रमांक ००९१४ अप शालीमार, पोरबंदर विशेष पार्सल गाडी २०,२२,२४,२६ एप्रिलला शालीमार स्टेशनहून २२.५० वाजता प्रस्थान करून तिसºया दिवशी १८.२५ ला पोरबंदर स्टेशनला पोहोचेल.
या गाड्यांना भुसावळ, अकोला , बडनेरा , नागपूर , दुर्ग , रायपूर , बिलासपूर ,नंदुरबार , सूरत , वरोदरा , आनंद , अहमदाबाद , सुरेन्द्र नगर , राजकोट , जामनगर येथे थांबा असेल, असेही रेल्वे प्रशासनाने कळविले आहे.