पुरी-उधना साप्ताहिक विशेष रेल्वेच्या अकोलामार्गे चार फेऱ्या

By Atul.jaiswal | Published: July 15, 2023 05:16 PM2023-07-15T17:16:02+5:302023-07-15T17:16:15+5:30

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले ओडिशा राज्यातील पुरी व गुजरात राज्यातील उधना या दोन स्थानकांदरम्यान साप्ताहिक विशेष रेल्वे चालविण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे.

Four trips of Puri-Udhana weekly special train via Akola | पुरी-उधना साप्ताहिक विशेष रेल्वेच्या अकोलामार्गे चार फेऱ्या

पुरी-उधना साप्ताहिक विशेष रेल्वेच्या अकोलामार्गे चार फेऱ्या

googlenewsNext

अकोला : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले ओडिशा राज्यातील पुरी व गुजरात राज्यातील उधना या दोन स्थानकांदरम्यान साप्ताहिक विशेष रेल्वे चालविण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. १२ जुलैपासून सुरु झालेली ही विशेष गाडी अकोला स्थानकावरून जाणार असल्याने अकोलेकरांना पुरी व सुरतसाठी आणखी एक गाडी उपलब्ध झाली आहे.रेल्वेने जारी केलेल्या पत्रकानुसार, गाडी क्र. ०८४६५ पुरी-उधना साप्ताहिक विशेष एक्स्प्रेस १२ जुलै ते २ ऑगस्ट दरम्यान दर बुधवारी पुरी रेल्वे स्थानकावरून १४:५५ वाजता रवाना होईल.

ही गाडी अकोला स्थानकावर दुसऱ्या दिवशी १२:३७ वाजता येऊन त्याच दिवशी उधना स्थानकावर रात्री २०:१५ वाजता उधना स्थानकावर पोहोचणार आहे. परतीच्या प्रवासात गाडी क्र. ०८४६६ उधना-पुरी साप्ताहिक विशेष एक्स्प्रेस १३ जुलै ते ३ ऑगस्ट दरम्यान दर गुरुवारी उधना रेल्वे स्थानकावरून २३:०० वा रवाना होईल.

ही गाडी अकोला स्थानकावर दुसऱ्या दिवशी सकाळी ७:१७ वाजता येऊन शनिवारी ६:५५ वाजता उधना स्थानावर पोहोचणार आहे. या गाडीला बडनेरा, अकोला, शेगाव, मलकापूर, भूसावळ स्थानकावर थांबा असणार आहे.

Web Title: Four trips of Puri-Udhana weekly special train via Akola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.