मूर्तिजापूर तालुक्यात चार गावे ‘सील’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 04:16 AM2021-05-17T04:16:54+5:302021-05-17T04:16:54+5:30
तालुक्यातील सिरसो, मधापुरी, दहातोंडा, राजुरा सरोदे या गावात १०पेक्षा जास्त कोरोना पॉझिटिव्ह आल्याने जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने उपरोक्त गावे ...
तालुक्यातील सिरसो, मधापुरी, दहातोंडा, राजुरा सरोदे या गावात १०पेक्षा जास्त कोरोना पॉझिटिव्ह आल्याने जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने उपरोक्त गावे प्रतिबंधित क्षेत्र घोषित केल्याने रविवारी सीमा क्षेत्र ‘सील’ करण्यात आली आहेत.
तालुक्यातील चार गावांमध्ये कडक निर्बंध लावण्यात आले असून गावातील सर्व व्यवहार बंद करण्यात आले आहेत. दरम्यान, सिरसो येथे कॉलनी भागात रुग्ण आढळून आले असल्याने कॉलनी भाग बंद करणे गरजेचे असताना मूळ गावच बंद करण्यात आले आले असल्याने गावकऱ्यात कमालीची नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. (फोटो)
---------------
जखम पायाला पट्टी डोक्याला!
तालुक्यातील चार सीमा प्रतिबंधित करून सील करण्यात आल्या आहेत. या गावांमध्ये सिरसो या गावचे भौगोलिक क्षेत्र जास्त असून, पारधीबेडा व व कॉलनी भागात जास्त रुग्ण आढळून आले आहेत. वास्तविक सिरसो मूळ गावात नाममात्र रुग्ण असून, मुख्य गावच सील करण्यात आल्याने ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. हा प्रकार म्हणजे जखम पायाला पट्टी डोक्याला असाच म्हणावा लागेल.
------------
आदेशानुसार गावाच्या सीमा बंद करण्यात आल्या आहेत. मूळ सिरसो गाव बंद करण्यात आले असले, तरी परिस्थितीनुसार त्यामध्ये बदल करण्यात येईल, इतर गावे व सिरसो कॉलनीतील पुढील आदेशापर्यंत सीमा बंद राहील.
- अभयसिंह मोहिते, उपविभागीय अधिकारी, मूर्तिजापूर