चारचाकी वाहन उलटले; महिला डॉक्टरसह दोन जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2020 10:25 AM2020-04-24T10:25:56+5:302020-04-24T10:26:01+5:30
डॉ. ऐश्वर्या गुजराती यांच्या हाता-पायाला गंभीर दुखापत झाली असून, भाऊ गौरव यालासुद्धा छातीला मार लागला आहे.
मूर्तिजापूर : भरधाव चारचाकी वाहन उलटल्याने महिला डॉक्टरसह दोन जण जखमी झाले. ही घटना राष्ट्रीय महामार्गावरील जामठी फाटानजीक २३ एप्रिल रोजी घडली. यातील एक जण गंभीर जखमी जखमी आहे.
बाळापूर येथील रहिवासी डॉ. ऐश्वर्या गुजराती (२३) या अमरावती येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात आपल्या कर्तव्यावर हजर होण्यासाठी त्यांचा लहान भाऊ गौरव गुजराती (२१) याच्या समवेत एमएच ३०-११७८ या वाहनाने जात होते. दरम्यान, जामठी फाट्याजवळ वाहनाचे अचानक टायर फुटल्याने गाडी उलटली. या अपघातात डॉ. ऐश्वर्या गुजराती यांच्या हाता-पायाला गंभीर दुखापत झाली असून, भाऊ गौरव यालासुद्धा छातीला मार लागला आहे. गाडीचा चालक अनिल दिगंबर शिजोळे यालासुद्धा दुखापत झाली आहे. अपघात होताच आजूबाजूच्या नागरिकांनी जखमींना त्वरित बाहेर काढून १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेतून अकोला येथे एका खासगी रुग्णालयात उपचाराकरिता दाखल केले आहे. या घटनेमध्ये उलटलेल्या वाहनाचा चुराडा झाल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सुदैवाने मोठा अनर्थ टळला. (शहर प्रतिनिधी)