चार शब्दकाेशांनी वाढविला वऱ्हाडीचा गाेडवा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:34 AM2021-03-04T04:34:05+5:302021-03-04T04:34:05+5:30
...........बाॅक्स............ वऱ्हाडात काढली काव्ययात्रा डॉ. विठ्ठल वाघ हे वऱ्हाडातील असल्यामुळे आयुष्यभराच्या, ४०-५० वर्षांच्या त्यांच्या अवलोकनातून हा प्रकल्प उभा राहिला. ...
...........बाॅक्स............
वऱ्हाडात काढली काव्ययात्रा
डॉ. विठ्ठल वाघ हे वऱ्हाडातील असल्यामुळे आयुष्यभराच्या, ४०-५० वर्षांच्या त्यांच्या अवलोकनातून हा प्रकल्प उभा राहिला. ‘पारंपरिक वऱ्हाडी म्हणीचा चिकित्सक अभ्यास’ हा त्यांच्या संशोधनाचा विषय असल्यामुळे संपूर्ण वऱ्हाडात काव्ययात्रा काढली. या काव्ययात्रेत पायी गावागावात फिरून लोकांच्या समोर ‘तिफण हाकलली’ आणि वऱ्हाडातील हजारो लोकांनी म्हणी, शब्द, वाक्प्रचारांच्या ओट्या भरूभरू या ‘तिफणकऱ्याला’ लोकवाङ्मयाने श्रीमंत केले. तीच श्रीमंती आज या कोशांना लाभल्याचे बाेलीभाषा अभ्यासक सांगतात.
-----------
मुख्यमंत्र्यांनी केले काैतुक
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठी भाषा दिनानिमित्त राज्य मराठी विकास संस्थेच्या वाङ्मय पुरस्कार सोहळ्यात वऱ्हाडी बोलीच्या कोशाचा उल्लेख करून काैतुक केले. श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख व सर्व कार्यकारिणी सदस्य, श्री शिवाजी महाविद्यालय अकोला विकास समितीचे सदस्य व महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. रामेश्वर भिसे यांनी डॉ. विठ्ठल वाघ यांचे अभिनंदन केले.