चौदा हजार क्ंिवटल तूर मोजणीविना पडून !
By admin | Published: July 4, 2017 02:45 AM2017-07-04T02:45:46+5:302017-07-04T02:45:46+5:30
तातडीने खरेदी करा : शेतकरी जागर मंच जिल्हाधिकारी कार्यालयावर
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांची हजारो क्ंिवटल तूर विक्रीविना पडून आहे, ही तूर तातडीने खरेदी करू न आर्थिक अडचनीत सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा द्यावा तसेच तूर खरेदीत दिरंगाई करणाऱ्यावर कारवाई करावी अशी मागणी शेतकरी जागर मंचच्यावतीने सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
अकोला बाजारात समितीच्या आवारात दोन महिन्यांपासून २५५ वाहनांमध्ये असलेली शेतकऱ्यांची तूर पडून आहे. आजपर्यंत त्या तुरीचे मोजमाप आणि खरेदी झालेली नाही. शासनाच्या परिपत्रकानुसार शेतकऱ्यांनी येथे आणलेली असून त्याची नोंंद बाजार समितीने घेतली आहे.परंतु नाफेडने जाणिवपुर्वक ही तूर खरेदी केली नाही असा आरोप या निवेदनातून करण्यात आला आहे.खरीप हंगामातील शेत,मशागत, पेरणी अशावेळी शेतकऱ्यांना वेठीस धरू न आर्थिक अडचनीत टाकले आहे. तसेच तूर खरेदी ही मुदतीपुर्वी ८ जून ला बंद करण्यात आली आहे. तूर बाजार समितीच्या आवारात असताना खरेदी बंद केली कशी ही तर शासनाच्या आदेशाची पायमल्ली आहे. असा प्रश्नही उपस्थित करण्यात आला आहे.यावेळी शेतकरी जागर मंचाचे मनोज तायडे, प्रशांत गावंडे, जगदिश मुरू मकार, ज्ञानेश्वर सुलताने,मुंकूद भरणे, दिनकरराव वाघ, साबीरीभाई, सुधाकर वानखडे,संजय मुळे,एकनाथ सिरसाट, खेडकर आदींसह जागर मंचाचे पदाधिकारी,सदस्यांची उपस्थिती होती.