औषधांच्या नावावर १४ लाखांची फसवणूक, गुन्हा दाखल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:24 AM2021-04-30T04:24:04+5:302021-04-30T04:24:04+5:30

रिंगरोड समता कॉलनी येथील रहिवासी अविनाश नेमीचंद चव्हाण (३७) यांच्या तक्रारीनुसार, ते घाऊक व किरकोळ औषध विक्रीचे व्यावसायिक आहेत. ...

Fraud of Rs 14 lakh in the name of drugs, case filed! | औषधांच्या नावावर १४ लाखांची फसवणूक, गुन्हा दाखल!

औषधांच्या नावावर १४ लाखांची फसवणूक, गुन्हा दाखल!

Next

रिंगरोड समता कॉलनी येथील रहिवासी अविनाश नेमीचंद चव्हाण (३७) यांच्या तक्रारीनुसार, ते घाऊक व किरकोळ औषध विक्रीचे व्यावसायिक आहेत. दरम्यान, त्यांची आरोपी अंकुर अशोक मोहोड (३२) रा. हिंगणा रोड बलोदे लेआउट याच्याशी ओळख झाली. आरोपीने शासकीय कंत्राटदार असल्याचे सांगून धुळे नगर परिषदेचे खोटे टेंडर दिले. त्यासाठी औषधापोटी चव्हाण यांना तीन लाख रुपयांची रक्कम भरण्याचे सांगितले. त्यानंतर चव्हाण यांनी पुन्हा ७ लाख ७० हजार रुपये जमा केले. याप्रमाणे त्यांनी आरोपीला एकूण १४ लाख १०१ रुपये पाठविले. पेमेंट केल्यानंतरही आरोपीने औषधांची डिलिव्हरी केली नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर अविनाश नेमीचंद चव्हाण यांनी खदाण पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीनुसार पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला २ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

Web Title: Fraud of Rs 14 lakh in the name of drugs, case filed!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.