एटीएममधून पैसे काढून शेतक-याची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2016 03:24 AM2016-10-27T03:24:09+5:302016-10-27T03:24:09+5:30

खामगाव तालुक्यातील घटना; ३0 हजार रूपये लंपास

Fraudulent fraud by withdrawing money from ATMs | एटीएममधून पैसे काढून शेतक-याची फसवणूक

एटीएममधून पैसे काढून शेतक-याची फसवणूक

Next

खामगाव, दि. २६- मॅनेजर असल्याची बातावणी करुन शेतकर्‍याच्या एटीएममधून ३0 हजार रूपये काढून शेतकर्‍याची फसवणूक केल्याची घटना बुधवारी उघडकीस आली.
तालुक्यातील पिंप्री देशमुख येथील ईश्‍वर भगवान अंभोरे (वय ३२) यांना मंगळवारी सायंकाळच्या सुमारास अज्ञात इसमाने सिंडीकेड बँकेतून शाखा व्यवस्थापक बोलत असल्याचे भासवून बंद पडलेले एटीएम कार्ड सुरू करण्याकरीता एटीएम व अकाऊंट नंबर मागितला. त्यानंतर बुधवारी ईश्‍वर अंभोरे यांनी खामगाव येथील सिंडीकेड बँकेत चौकशी केली असता त्यांच्या खात्यातून ३0 हजार रूपये लंपास झाल्याचे उघडकीस आले. सिंडीकेड बँकेतून कोणीही एटीएम कार्डबाबत फोन केला नसल्याचे सांगण्यात आले. याबाबत शेतकर्‍याने पोलिसात तक्रार दिली आहे.

Web Title: Fraudulent fraud by withdrawing money from ATMs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.