फुकट्या जाहिरातदारांनी बिघडवले शहराचे साैंदर्य !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 04:55 AM2021-01-08T04:55:46+5:302021-01-08T04:55:46+5:30

अकाेला : शहरातील मुख्य चौक, रस्त्याच्या मधोमध तथा काही पुलांवर नगर परिषदेकडून रीतसर परवानगी न घेता काही जण स्वत:सह ...

Free advertisers spoil the beauty of the city! | फुकट्या जाहिरातदारांनी बिघडवले शहराचे साैंदर्य !

फुकट्या जाहिरातदारांनी बिघडवले शहराचे साैंदर्य !

Next

अकाेला : शहरातील मुख्य चौक, रस्त्याच्या मधोमध तथा काही पुलांवर नगर परिषदेकडून रीतसर परवानगी न घेता काही जण स्वत:सह मित्रमंडळींची जाहिरात करीत आहेत. अशा फुकट्या जाहिरातदारांमुळे मात्र शहराचे विद्रूपीकरण होत आहे. एकीकडे उत्पन्नाअभावी मनपा कर्मचाऱ्यांना थकीत वेतनाच्या समस्येचा सामना करावा लागत असतानाच दुसरीकडे मनपाच्या परवाना व अतिक्रमण विभागाकडून शहरात सुळसुळाट झालेल्या अनधिकृत हाेर्डिंगविराेधात कारवाई न करता पाठराखण केली जात आहे.

मनपाच्या वतीने शहरात जाहिरातींसाठी मोक्याच्या जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. संबंधित जागेवर होर्डिंग उभारण्याच्या बदल्यात महापालिकेकडे रीतसर नोंदणी करून प्रतिदिवस याप्रमाणे एकरकमी शुल्क जमा करावी लागते. प्रशासनाने निश्चित केलेल्या जागांच्या व्यतिरिक्त शहरात अनधिकृत होर्डिंग, बॅनरचा सुळसुळाट झाल्याचे दिसत आहे. यामध्ये काही जाहिरात कंपन्यांसह प्रामुख्याने विविध पक्षांतील राजकारण्यांच्या चेलेचपाट्यांचा समावेश असल्याचे दिसून येते. शहरातील गल्लीबोळात अनधिकृत होर्डिंगचे पेव फुटले आहे.

प्रशासनाच्या डुलक्या

महानगरपालिकांच्या कार्यक्षेत्रात अनेकांनी विनापरवानगी विविध ठिकाणी जाहिरातींचे होर्डिंग्ज लावलेले आहेत. संबंधितांवर कारवाई करण्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.

n अशाेक वाटिका ते जिल्हा सामान्य रुग्णालयाचे प्रवेशद्वार, अशाेक वाटिका ते नेहरू पार्क चाैक, निमवाडी चाैक ते गुरांचा बाजार रस्ता, नेहरू पार्क ते महापारेषण कार्यालय, सिव्हिल लाइन चाैक ते रतनलाल प्लाॅट चाैक आदी मुख्य रस्त्यांलगत खांब उभारण्यात आल्याचे दिसते.

n फलक लावणाऱ्यांमध्ये काही राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते अग्रेसर आहेत. त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारल्यास पॉलिटिकल प्रेशर येत असल्याचे बोलले जात आहे.

दंडात्मक कारवाईची गरज

शहराच्या सौंदर्यीकरणाची वाट लावणाऱ्या होर्डिंग, फलकांना जागा दिसेल त्याठिकाणी परवाना देण्याचे काम यापूर्वी अतिक्रमण विभागाने व आता परवाना विभागाकडून हाेत असल्याचा आराेप आहे. मनपा प्रशासनाने अनधिकृत बॅनर, फलक, हाेर्डिंगविराेधात दंडात्मक कारवाई करण्याची गरज आहे. मनपाने निश्चित केलेल्या जागेव्यतिरिक्त काही व्यावसायिकांनी मुख्य रस्त्यांलगत नियमबाह्यपणे हाेर्डिंगसाठी खांब उभारले आहेत.

Web Title: Free advertisers spoil the beauty of the city!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.