भरतीया रुग्णालयात मोफत कोरोना चाचणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2020 04:35 AM2020-12-12T04:35:41+5:302020-12-12T04:35:41+5:30
ध्वजदिन निधीत योगदान द्या- जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर अकोला : देशाच्या सीमेवर लढणाऱ्या सैनिकांच्या कल्याणासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध हितकारी उपक्रमांमध्ये ...
ध्वजदिन निधीत योगदान द्या- जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर
अकोला : देशाच्या सीमेवर लढणाऱ्या सैनिकांच्या कल्याणासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध हितकारी उपक्रमांमध्ये योगदान देण्यासाठी ध्वजदिन निधी संकलित केला जातो. या निधीत प्रत्येकाने आपापले योगदान देऊन सैनिकांप्रति आपली कृतज्ञता व्यक्त करावी. सर्व विभागांनी ध्वजदिन निधी संकलनाचे उद्दिष्ट ३१ जानेवारी २०२१ पूर्वी पूर्ण करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आज येथे केले.
जिल्ह्यातील ध्वजदिन निधी संकलनास आज जिल्हा नियोजन भवन येथून सुरुवात करण्यात आली. यावेळी अपर जिल्हाधिकारी अनिल खंडागळे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपविभागीय अधिकारी डॉ. नीलेश अपार, श्रीकांत देशपांडे, रामेश्वर पुरी, विश्वनाथ घुगे, उपजिल्हाधिकारी व प्रभारी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी बाबासाहेब गाढवे, उपजिल्हाधिकारी गजानन सुरंजे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी मुकेश चव्हाण, सदाशिव शेलार, जिल्हा पुरवठा अधिकारी बबनराव काळे आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आपल्या निधीचे योगदान देऊन या मोहिमेचा शुभारंभ केला. तसेच गतवर्षी उत्कृष्ट ध्वजदिन निधी संकलन केलेल्या जिल्हा परिषद, पोलीस अधीक्षक कार्यालय, प्रादेशिक परिवहन कार्यालय, राज्य उत्पादन शुल्क विभाग या कार्यालयांचा सन्मान करण्यात आला. तसेच यावेळी माहिती देण्यात आली की गेल्या वर्षी ६८ लाख ३० हजार रुपये इतक्या निधी संकलनाचे उद्दिष्ट होते त्यापैकी ९८ टक्के उद्दिष्ट हे पूर्ण झाले असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. प्रास्ताविक व आभारप्रदर्शन उपजिल्हाधिकारी बाबासाहेब गाढवे यांनी केले.
अकोला येथील न्याय सेवा सदनाचे शनिवारी ई-उद्घाटन
अकोला : येथील वैकल्पिक वाद निवारण केंद्राच्या नवीन इमारतीचे अर्थात न्याय सेवा सदन या जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या नवीन इमारतीचे शनिवार, दि.१२ रोजी सकाळी ११ वाजता ई-उद्घाटन होणार आहे, असे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव स्वरूपकुमार बोस यांनी कळविले आहे.
यासंदर्भात दिलेल्या माहितीनुसार, जिल्हा न्यायालय अकोला येथील ‘न्याय सेवा सदन’ या जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या नवीन न्यायालय इमारतीचा ई-उद्घाटन समारंभ शनिवार, दि.१२ रोजी सकाळी ११ वाजता होणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती तथा महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष ए. ए. सय्यद यांच्या हस्ते हे उद्घाटन होणार आहे. यावेळी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती झेड. ए. हक, राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबईचे सदस्य सचिव अभय मंत्री यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी अकोल्याचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यनशिवराज खोब्रागडे हे राहणार आहेत.