वाडेगाव येथे सॅनिटायझरचे मोफत वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 06:12 AM2021-02-05T06:12:24+5:302021-02-05T06:12:24+5:30
------------------------------------------------- कवठा येथील शाळा पूर्ववत सुरू! कवठा : कोरोनाच्या पृष्ठभूमीवर गत दहा महिन्यांपासून बंद असलेली शाळा पुन्हा २७ ...
-------------------------------------------------
कवठा येथील शाळा पूर्ववत सुरू!
कवठा : कोरोनाच्या पृष्ठभूमीवर गत दहा महिन्यांपासून बंद असलेली शाळा पुन्हा २७ जानेवारी रोजी सुरू झाली आहे. येथील जि. प. शाळेत फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करण्यात आले. वर्ग सुरू होण्यापूर्वी शाळेचे निर्जंतुकीकरण करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक वानखडे, भोंबळे, गवई, आदी शिक्षक उपस्थित होते.
०-----------------------
दानापूर येथील पशु वैद्यकीय रुग्णालयास भेट
दानापूर : तेल्हारा पंचायत समितींतर्गत येत असलेल्या दानापूर येथील पशुवैद्यकीय रुग्णालयास कृषी व पशुसंवर्धन सभापती पंजाबराव वडाळ यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी जिल्हा परिषदेच्या सदस्या दीपमाला रवींद्र दामधर, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. किशोर पुंडकर यांची उपस्थिती होती. यावेळी शालीग्राम पुडके, गोपाळा विरघट, परशराम विरघट, ग्रामपंचायत सदस्य योगेश येऊल, परिचर दीपक मेश्राम, रामदास घायल, सुरेश खंडेराव, गोपाल विरघट, मोतीराम इंगळे, गणेश भुते, सुनीलकुमार धुरडे यांची उपस्थिती होती.
------------------------------------------------------
पास्टूल-पातूरमार्गे बसफेऱ्या सुरू करा!
खानापूर : कोरोनाच्या पृष्ठभूमीवर बंद असलेली बससेवा अनलॉक प्रक्रियेत सुरू करण्यात आली; मात्र अद्यापही ग्रामीण भागात बससेवा सुरू न झाल्याने विद्यार्थ्यांसह ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. त्यामुळे खानापूर-आस्टूल-पास्टूल-पातूर मार्गे बस फेऱ्या सुरू करण्याची मागणी होत आहे.
--------------------------------------
दानापूर येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात
दानापूर : येथील जि. प. शाळेत मुख्याध्यापक विश्वेश्वर पातुर्डे यांच्या हस्ते ध्वजारोहण करून प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष महादेव वानखडे, उपाध्यक्ष सुकेशनी वाकोडे, जिल्हा परिषदेचे सदस्य दीपमाला दामधर, पंचायत समिती सदस्य संदीप पालीवाल, नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य गोपाल विखे, सपना वाकोडे, गणेश सांगूनवेढे, रवींद्र तायडे, योगेश येऊल, सागर ढगे, वासुदेव खवले, गोपाल माकोडे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन खोडे यांनी केले, तर डाबेराव यांनी आभार मानले.