गरजू शेतकर्‍यांना बियाण्यांचे मोफत वाटप

By admin | Published: May 17, 2014 06:35 PM2014-05-17T18:35:52+5:302014-05-17T18:46:16+5:30

मूर्तिजापूर तालुक्यातील कृषीसेवा केंद्रांच्या बी-बियाणे विक्रीचा शुभारंभ नुकताच करण्यात आला

Free distribution of seeds to needy farmers | गरजू शेतकर्‍यांना बियाण्यांचे मोफत वाटप

गरजू शेतकर्‍यांना बियाण्यांचे मोफत वाटप

Next

मूर्तिजापूर : तालुक्यातील कृषी सेवा केंद्रांच्या बी-बियाणे विक्रीचा शुभारंभ नुकताच करण्यात आला. या प्रसंगी आयोजित समारंभात काही गरजू शेतकर्‍यांना बियाण्यांचे मोफत वाटप करण्यात आले. दरवर्षीप्रमाणे यंदाही कृषी सेवा केंद्रांमार्फत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला माजी सभापती जमील कुरेशी उपस्थित होते. कमी खर्चात शेती करून जास्तीत जास्त उत्पादन कसे घ्यावे, याविषयी शेतकर्‍यांना या कार्यक्र मात मार्गदर्शन करण्यात आले. शेतकर्‍यांची फसवणूक करणारी टोळी विविध ठिकाणी सक्रिय आहे. आजच्या या युगात सर्व आपापला फायदा पाहत आहेत; परंतु असे कार्य सर्वच ठिकाणी होत नाही. केंद्रीय कृ षी मंत्रालय व कृषी उद्योग महामंडळद्वारा पुरस्कृत असलेल्या शहरात सेवा आणि शेतकर्‍यांच्या हितचिंतनाचे कार्य करणार्‍या कृ षी सेवा केंद्रांच्या विश्वासामुळे मूर्तिजापूर तालुक्यातील शेतकर्‍यांना योग्य मार्गदर्शन मिळाल्याचे मत जमील कुरेशी यांनी व्यक्त केले. 

Web Title: Free distribution of seeds to needy farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.