‘आयसीएआय’च्या माजी अध्यक्षांचे ‘सीए’ करिअरविषयी आज मोफत मार्गदर्शन

By Admin | Published: June 29, 2015 02:05 AM2015-06-29T02:05:56+5:302015-06-29T02:05:56+5:30

लोकमत युवा नेक्स्ट व राठी करिअर फोरम यांचा संयुक्त उपक्रम.

Free guidance from today about 'CA' career of former president of ICAI | ‘आयसीएआय’च्या माजी अध्यक्षांचे ‘सीए’ करिअरविषयी आज मोफत मार्गदर्शन

‘आयसीएआय’च्या माजी अध्यक्षांचे ‘सीए’ करिअरविषयी आज मोफत मार्गदर्शन

googlenewsNext

अकोला : लोकमत आणि राठी करिअर फोरम यांच्या संयुक्त विद्यमाने ह्यचार्टर्ड अकाउंटंट क्षेत्रात करिअर व संधीह्ण या विषयावर आयसीएआयचे माजी अध्यक्ष यांचे सोमवार, २९ जून रोजी सकाळी ११ वाजता खंडेलवाल भवन गोरक्षण रोड येथे विद्यार्थी आणि पालकांसाठी मोफत मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले आहे. दी इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाचे (आयसीएआय) माजी राष्ट्रीय अध्यक्ष जयदीप शहा हे मार्गदर्शन करणार आहेत. चार्टर्ड अकाउंटंटला समाजात मानाचे स्थान आहे. सी.ए. पदवी मिळताच करिअरची अनेक दालने उघडतात. नोकरी, कन्सलटंसी, प्रॅक्टिस, गुंतवणूक, बँकिंग अशा विविध क्षेत्रांमध्ये देशात व परदेशात करिअर करता येते. पैसा कसा उभारावा, कसा हाताळावा व गुंतवावा याचे सखोल ज्ञान असल्याने व्यवसाय व उद्योगात सी. ए. यशस्वी होतात. अशा बहुआयामी अभ्यासक्रमाबाबत जयदीप शहा मार्गदर्शन करतील. जयदीप शहा हे सी. ए. इन्स्टिट्यूटच्या बोर्ड ऑफ स्टडीज विभागाचे तीन वेळा अध्यक्ष राहिले आहेत. त्यांना सी.पी.टी.चे (सी. ए. प्रवेश परीक्षा) जनक संबोधले जाते. सी. ए. ची परीक्षा अतिशय अवघड असते, असा गैरसमज आहे. तो शहा यांच्या मार्गदर्शनानंतर निश्‍चितच दूर होईल. अकोलेकरांना नि:शुल्क मार्गदर्शन शिबिराची संधी मिळणार आहे. सी. ए. होण्यासाठी लागणारी पात्रता, प्रवेश परीक्षा पद्धती (सीपीटी), अभ्यासक्रम, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर मिळणार्‍या संधी इ. विषयांवर शहा साध्या आणि सोप्या भाषेत मार्गदर्शन करणार आहेत. दहावी ते बारावीच्या कोणत्याही शाखेतील विद्यार्थ्यांनी पालकांसोबत उपस्थित राहावे. विशेषत: बारावी झालेल्या ज्या विद्यार्थ्यांची अभियांत्रिकी, वैद्यकीयसाठी निवड होऊ शकली नाही, त्यांनी सी. ए. करिअरची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आवर्जून या मार्गदर्शनास उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. अधिक माहितीसाठी ९८५0३८२१४0 या क्रमांकावर संपर्क साधावा.

Web Title: Free guidance from today about 'CA' career of former president of ICAI

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.