वारक-यांसाठी मोफत वैद्यकिय सेवा देणारा ‘उंबरठा’ !

By admin | Published: February 16, 2017 05:28 PM2017-02-16T17:28:37+5:302017-02-16T18:18:16+5:30

वारकºयांकरीता १६ ते १९ फेब्रुवारी दरम्यान मोफत वैद्यकिय सेवा देण्यात येणार आहे.

Free medical service provider 'threshold' for Warkaris! | वारक-यांसाठी मोफत वैद्यकिय सेवा देणारा ‘उंबरठा’ !

वारक-यांसाठी मोफत वैद्यकिय सेवा देणारा ‘उंबरठा’ !

Next

 

  •  ऑनलाइन लोकमत 

  • वाशिम - श्री संत गजानन महाराज यांच्या प्रकट दिनानिमित्त आर्ट आॅफ लिव्हींग परिवार, डॉ. हरिष बाहेती दाम्पत्य व उंबरठा संस्थेच्या वतीने शेगाव येथील वारकऱ्यांकरीता १६ ते १९ फेब्रुवारी दरम्यान मोफत वैद्यकिय सेवा देण्यात येणार आहे.
    १६ फेब्रुवारी रोजी सर्व सुविधा सज्ज असणारी रुग्णवाहिका शेगावीच्या दिशेने रवाना झाली. आर्ट आॅफ लिव्हींगचे प्रशिक्षक डॉ. हरिष बाहेती व डॉ. सरोज बाहेती यांच्या मार्गदर्शनात हे पथक रवाना झाले असून वारकऱ्यांना मोफत वैद्यकिय सेवा औषधी व तपासणी करण्यात येणार आहे. तिसरा उंबरठा संस्थेच्या अध्यक्षा डॉ. सरोज बाहेती, डॉ. सचिन बाहेती, निलेश सोमाणी यांनी या पथकाला हिरवी झेंडी दाखविली. यावेळी डॉ. हनुमान नानवटे, विजय चव्हाण, स्वप्नील कतोरे, संजय डुकरे, अरुण इंगोले, भगवान देशमुख, ओंकार देशमुख, गजानन कांबळे, गणेश मोटे, अमन देशमुख, संदीप बाहेती, अरुण भिसडे, बलदवा, बावणे व देशपांडे आदींची उपस्थिती होती.

Web Title: Free medical service provider 'threshold' for Warkaris!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.