२४ गोदामांच्या बांधकामांचा मार्ग मोकळा
By admin | Published: March 20, 2015 12:29 AM2015-03-20T00:29:37+5:302015-03-20T00:29:37+5:30
राज्यातील १७ जिल्ह्यांमध्ये २४ शासकीय धान्य गोदामांच्या बांधकामांसाठी १0 कोटी ८७ लाखांचा निधी उपलब्ध.
अकोला : नाबार्डच्या ग्रामीण पायाभूत विकास निधी अंतर्गत राज्यातील १७ जिल्ह्यांमध्ये २४ शासकीय धान्य गोदामांच्या बांधकामांसाठी १0 कोटी ८७ लाखांचा निधी उपलब्ध करण्यास शासनामार्फत १0 मार्च रोजी मान्यता देण्यात आली. त्यामुळे गोदामांच्या बांधकामांचा मार्ग आता मोकळा झाला आहे. नाबार्डच्या ग्रामीण पायाभूत विकास निधी अंतर्गत राज्यातील १७ जिल्ह्यांमध्ये २४ शासकीय गोदामांच्या बांधकामांसाठी राज्य शासनामार्फत प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. प्रशासकीय मान्यतेच्या आदेशानुसार ही २४ शासकीय गोदामे उभारण्यासाठी १0 कोटी ८७ लाखांचा निधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय शासनाच्या अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागामार्फत १0 मार्च रोजी घेण्यात आला. त्यामुळे सार्वजनिक वितरण व्यवस्था अंतर्गत राज्यातील २४ गोदामांचे बांधकाम मार्गी लागणार आहे. त्यापैकी अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये सहा गोदामांचा समावेश आहे.
*अमरावती विभागातील सहा गोदामांसाठी उपलब्ध निधी!
जिल्हा गोदामाचे ठिकाण निधी
वाशिम मालेगाव ७६,९0,0८0
अकोला मूर्तिजापूर ४५,४८,७४१
बुलडाणा देऊळगावराजा ३३,२४,३७७
यवतमाळ नेर ३७,४0,२५0
अमरावती चांदूर रेल्वे ४0,३४,0५0
यवतमाळ दिग्रस २९,९४,७६५