मलकापूरच्या पाणीपुरवठय़ाचा मार्ग मोकळा

By admin | Published: March 25, 2017 01:17 AM2017-03-25T01:17:53+5:302017-03-25T01:17:53+5:30

मनपा प्रशासनाने तडजोड करून चार लाख रुपये महावितरणकडे जमा केल्यामुळे मलकापूर परिसरातील पाणीपुरवठय़ाचा मार्ग मोकळा झाला आहे.

Free the way for water supply of Malkapur | मलकापूरच्या पाणीपुरवठय़ाचा मार्ग मोकळा

मलकापूरच्या पाणीपुरवठय़ाचा मार्ग मोकळा

Next

अकोला, दि. २४- तत्कालीन मलकापूर ग्रामपंचायतने वीज बिलाचा भरणा न केल्यामुळे महावितरण कंपनीने मलकापूर परिसराला पाणीपुरवठा करणार्‍या चांदुर केंद्राचा वीज पुरवठा खंडित केला होता. अखेर मनपा प्रशासनाने तडजोड करून चार लाख रुपये महावितरणकडे जमा केल्यामुळे मलकापूर परिसरातील पाणीपुरवठय़ाचा मार्ग मोकळा झाला आहे.
महापालिका क्षेत्राची हद्दवाढ होण्यापूर्वी तत्कालीन मलकापूर ग्रामपंचायतला चांदुर कें द्रावरून पाणीपुरवठा होत असे. त्यावेळी ग्रामपंचायतकडे सुमारे २५ लाख रुपयांपर्यंंंतचे वीज देयक थकीत होते. सद्यस्थितीत मलकापूर परिसराचा समावेश महापालिका क्षेत्रात झाला असून, साहजिकच थकीत वीज देयकाची जबाबदारी मनपा प्रशासनाकडे चालून आली आहे. ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर वीज कंपनीने थकीत देयकापोटी मलकापूर परिसराला चांदुर केंद्रावरून होणार्‍या पाणीपुरवठा योजनेचा वीज पुरवठा खंडित केला. मनपा प्रशासनाने वीज कंपनीसोबत चर्चा करून थकीत देयकापोटी सुमारे चार लाख रुपये देयक अदा केले आहे.

Web Title: Free the way for water supply of Malkapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.