महिला शिक्षण दिनी फ्रीडमने केले महिला शिक्षकांना सन्मानित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2021 04:16 AM2021-01-04T04:16:45+5:302021-01-04T04:16:45+5:30
आकोट : स्थानिक फ्रीडम प्राथमिक, उच्च प्राथमिक व माध्यमिक मराठी शाळा आकोट व फ्रीडम इंग्लिश हायस्कूल, अकोट येथे क्रांतिज्योती ...
आकोट : स्थानिक फ्रीडम प्राथमिक, उच्च प्राथमिक व माध्यमिक मराठी शाळा आकोट व फ्रीडम इंग्लिश हायस्कूल, अकोट येथे क्रांतिज्योती तसेच आद्य शिक्षिका सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी फ्रीडम संस्थेचे अध्यक्ष मनोज झाडे हाेते. यावेळी शाळा समिती अध्यक्ष प्रवीण झाडे, इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापक कविता लहाने, मराठी शाळेच्या मुख्याध्यापक रश्मी करुले, पर्यवेक्षक विजय रेवस्कार, शारदा चांदुरकर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी संस्थेचे अध्यक्ष मनोज झाडे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवन कार्याविषयी मार्गदर्शन केले. मुख्याध्यापक कविता लहाने यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनातील प्रसंग विशद केले. उपस्थित महिला शिक्षकांचा गौरव करून त्यांना सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश इंगोले यांनी, तर आभार प्रदर्शन दीपिका मोहोड यांनी केले. कार्यक्रमासाठी फ्रीडम संस्थेतील सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.