वाहनचालकांच्या सुविधेसाठी वाहतुक शाखेचा अनोखा उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2017 01:53 PM2017-10-01T13:53:01+5:302017-10-01T13:53:46+5:30

The freight branch's unique initiative for the drivers' convenience | वाहनचालकांच्या सुविधेसाठी वाहतुक शाखेचा अनोखा उपक्रम

वाहनचालकांच्या सुविधेसाठी वाहतुक शाखेचा अनोखा उपक्रम

Next



सचिन राऊत
अकोला - हिंदु बांधवाचे नवदुर्गा देवी विसर्जण, बौध्द बांधवाचा मोठा उत्सव धम्मचक्र प्रवर्तन दिन, मुस्लीम बांधवांचा मोहर्रम या तीनही उत्सवानिमीत्त शहरात होणारी गर्दीमूळे वाहतुक शाखेने पर्यायी मार्ग उपलब्ध करून दिले आहेत. या मार्गाची माहिती नागरिकांसह वाहनचालकांना व्हावी म्हणूण वाहतुक शाखेने प्रथमच अनोखी पोष्टरबाजी केली. जिल्हाधिकारी आस्तीककुमार पाण्डेय, पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांच्या मार्गदर्शनात ही पोष्टरबाजी करण्यात आली आहे.
वाहतुक शाखेचे प्रमूख विलास पाटील यांनी वाहतुक शाखेचा पदभार स्विकारल्यानंतर अनोखे उपक्रम राबविण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणूण शहरासह ग्रामिण भागातील प्रवाश्यांना, वाहनचालकांची गैरसोय टाळण्यासाठी शहरातील वाहतुक मार्गात बदल करून त्याचे पोष्टर शहरात लावले आहेत. पोलिसांकडून प्रवासी व वाहनचालकांच्या सुवीधेसाठी पोष्टरबाजी केल्याचे हे प्रथमच झाल्याची चर्चा पोलिस खात्यात सुरु आहे. धम्मचक्र प्रवर्तन दिनानीमीत्त जिल्हयासह अन्य जिल्हयातील बौध्द बांधव मोठया संख्येने अकोल्यात दाखल होतात, या बौध्द बांधवांना अकोल्यात येतांना वाहतुकीमूळे त्रास होउ नये म्हणूण वाहतुूक शाखेचे प्रमूख विलास पाटील यांच्या अनोख्या संकल्पनेतून प्रथमच शहराच्या विविध भागात पोष्टरबाजी करण्यात आली आहे. या पोष्टरबाजीमूळे प्रवासी व वाहनचालकांची गैरसोय होत नसल्याच्या प्रतिक्रीया उमटत आहेत.
 

अधिकाºयांकडून पाहणी
धम्मचक्र प्रवर्तद दिन, मोहर्रमच्या मिरवणुक असलेल्या मार्गाची जिल्हाधिकारी आस्तीककुमार पाण्डेय, पोलीस अधीक्षक राकेश कलासागर,अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजयकांत सागर, शहर पोलीस उपअधिक्षक उमेश माने पाटील यांनी मार्गाची पाहणी केली. सोबतच त्यांनी वाहतुक शाखेने राबविलेल्या पोष्टरबाजीचेही कौतुक केले.

 

पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांच्या मार्गदर्शनातून ही अनोखी संकल्पना साकारण्यात आली आहे. यासाठी रस्त्यावर फलक लावण्यात आले आहेत. बाहेरगाव तसेच बाहेर जिल्हयातील येणाºया नागरिकांचा त्रास टाळण्याचा वाहतुक शाखेचा प्रयत्न आहे.
विलास पाटील, प्रमूख, वाहतुक शाखा, अकोला.

Web Title: The freight branch's unique initiative for the drivers' convenience

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.