मालवाहू वाहनाची दुचाकीस धडक, एक ठार, एक जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2020 08:49 PM2020-11-15T20:49:46+5:302020-11-15T20:50:35+5:30

मालवाहू - दुचाकी अपघात १ जण ठार १ गंभीर जखमी झाला आहे.

freight vehicles hit tow wheelar, 1 killed | मालवाहू वाहनाची दुचाकीस धडक, एक ठार, एक जखमी

मालवाहू वाहनाची दुचाकीस धडक, एक ठार, एक जखमी

Next

मूर्तिजापूर : सिरसो टी पॉईंट नाका नंबर ७ वर भरधाव मालवाहू वाहनाने दुचाकीस्वार जोरदार धडक दिल्याने दुचाकी वरील एकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर दुसरा गंभीर जखमी झाला. घटना १५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजताच्या दरम्यान घडली. रामहरी कुरुमकर (६५)हे घटनास्थळीच ठार झाले तर निरंजन चंदन (३६) हे गंभीर जखमी झाले. दोघेही तालुक्यातील दुर्गवाडा येथील रहिवासी आहेत. मूर्तिजापूर - दर्यापूर या राज्य मार्गाचे रुंदीकरण झाल्या हा मार्ग सुपरफास्ट झाला आहे. यामुळे या मार्गावरी भरधाव वाहनाची वर्दळ वाढली आहे, चार किलोमीटर अंतरावर गत दोन महिन्यात चौघांचा बळी गेला आहे. रविवारी घडलेल्या घटनेत दुर्गवाडा येथील निरंजन चंदन (३६) व रामहरी कुरुमकर (६५) हे दोघे शहरातील कामे आटोपून एमएच ३० एजे ५२९० या क्रमांकाच्या दुचाकीने गावी जात असताना दर्यापूर च्या दिशेने येणाऱ्या टी एस १५ यूडी ११३३ या मालवाहू वाहनाने जोरदार धडक दिल्याने दुचाकीरील एक जण घटनास्थळीच ठार झाला तर दुसरा गंभीर जखमी झाल्याने त्याला पुढील वाटचालीसाठी अकोला येथे पाठविण्यात आले आहे. मालवाहू चालक अमोल गवई(३४) रा. कवठा सोपीनाथ याने अतिप्रमाणात मद्य प्राशन करुन वाहन चालविल्याने अपघात झाल्याची माहिती आहे. अपघातानंतर मालवाहू घटनास्थळा पासून दीडशे मिटर अंतरावरील एक लोखंडी विद्युत खांबाला जाऊन धडकल्याने लोखंडी खांब संपूर्णपे वाकल्याने विद्युत तारा तुटल्या यामुळे परिसरात विद्युत पुरवठा खंडीत झाला. मालवाहू मध्ये चालक अमोल गवई याची पत्नी व एक लहान बालक प्रवास करीत होते याघटनेत बालक जखमी झाल्याची माहिती आहे चालक अमोल गवई याला शहर पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. घटनेची माहिती मिळताच वंदे मातरम् आपत्कालीन पथकाने घटनास्थळी धाव घेऊन जखमी व मृतकाला येथील लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयात पोहोचविले. अपघाताचे प्रमाण वाढल्याने या मार्गावर वर्दळीच्या ठिकाणी गती रोधक बसविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

Web Title: freight vehicles hit tow wheelar, 1 killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.