विद्युत पुरवठा वारंवार खंडित; नागरिक हैराण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:14 AM2021-06-03T04:14:47+5:302021-06-03T04:14:47+5:30
दहिहांडा येथे अघोषित भारनियमन दहिहांडा : येथील वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्यामुळे ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. पाऊस आला किंवा ...
दहिहांडा येथे अघोषित भारनियमन
दहिहांडा : येथील वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्यामुळे ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. पाऊस आला किंवा वारा सुटला तरी अनेक तासपर्यंत वीजपुरवठा खंडित होता. उन्हाळ्याच्या दिवसांत वीजपुरवठा खंडित होत असल्याने, नागरिक त्रस्त झाले आहेत. वीजपुरवठा दोन तासांपर्यंत तर कधी रात्रभर खंडित होतो. त्यामुळे ग्रामस्थांना अंधारात रात्र काढावी लागते. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या बाबीकडे लक्ष देऊन खंडित होणारा वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी होत आहे.
लसीकरण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद !
माझोड : कापशी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या माझोड येथे लसीकरण शिबिर पार पडले. शिबिरात २२० महिला-पुरुषांनी लसीकरणाचा लाभ घेतला. वैद्यकीय अधिकारी डॉ. अर्चना महल्ले, डॉ. रश्मी सराळे, आरोग्य निरीक्षक संजय डाबेराव, आरोग्य सेविका सलोनी पोटे, नवलकार, माजी पं. स. सदस्य राजेश ठाकरे, सरपंच पुष्पा रामेश्वर बोबडे, सचिव मधुशीला डोंगरे, तलाठी ज्योती कराळे, पोलीसपाटील शंकर ढोरे, गोपाल ताले ,मुख्याध्यापक राजेश मेश्राम, ग्रामपंचायत सदस्य अमोल मामनकार यांनी शिबिरासाठी सहकार्य केले.