प्रभाग १७ मध्ये आजी-माजी नगरसेवक अमोरासमोर

By admin | Published: February 17, 2017 02:37 AM2017-02-17T02:37:05+5:302017-02-17T02:37:05+5:30

एकूण नऊ उमेदवार निवडणूक रिंगणात

In front of the Grandmother in front of the Govt | प्रभाग १७ मध्ये आजी-माजी नगरसेवक अमोरासमोर

प्रभाग १७ मध्ये आजी-माजी नगरसेवक अमोरासमोर

Next

अकोला, दि. १६- जुने शहरातील प्रभाग क्रमांक १७ मधील ह्यडह्ण प्रवर्गात भाजपचे सुरेश अंधारे आणि शिवसेनेचे राजेश मिश्रा हे दोघे आजी-माजी नगरसेवक एकमेकांसमोर लढण्यासाठी उभे ठाकले आहे. काँग्रेसचे आझाद खान यांचे वडील आणि पत्नी नगरसेविका होती. त्यामुळे त्यांनाही राजकीय वारसा आहे. तर शिवसेनेचे माजी नगरसेवक राजेश मिश्रा आणि त्यांच्या पत्नी अनिता मिश्रा यांनी निवडणूक मैदानात सपत्नीक उडी घेतली आहे.
जुने शहरातील प्रभाग १३ मध्ये बाळापूर रोड, शिवसेना वसाहत, हरिहरपेठ, लोकमान्य नगर, सोनटक्के प्लॉट, भांडपुरा, अनंतनगर नबाबपुरा आदी परिसर येतो. येथील ह्यअह्ण प्रवर्गात भारिपकडून वसंत बेंडे, शिवसेनेकडून माजी नगरसेवक गजानन चव्हाण, राष्ट्रवादीकडून शीतल डाबेराव, भाजपकडून माजी नगरसेविकेचे पुत्र विजय हळदे, काँग्रेसकडून चंदा लठाड आणि एक अपक्ष असे एकूण सहा उमेदवार निवडणूक रिंगणात आहे. ह्यबह्ण प्रवर्गात भारिपकडून स्मिता अरुळकर, शिवसेनेकडून प्रमिला गीते, भाजपकडून सुशीला गुजर, एमआयएमकडून सकैय्या खान, काँग्रेसकडून मोहम्मद रेहाना, समाजवादीकडून नसीमा बानो आणि दोन अपक्ष असे एकूण नऊ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. ह्यकह्ण प्रवर्गात भाजपकडून फरजाना परवीन, राष्ट्रवादीकडून जकिरा खा, शिवसेनेकडून अनिता मिश्रा, काँग्रेसकडून सैय्यद शमीम, भारिप-बमसंकडू सुनीता ठाकूर आणि एक अपक्ष असे एकूण सहा उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. ह्यडह्ण प्रवर्गात भाजपकडून सुरेश अंधारे, राष्ट्रवादीकडून वैशाली काहकर, काँग्रेसकडून आझाद खान, शिवसेनेकडून राजेश मिश्रा, मनसेकडून गोपाल मुदगल निवडणूक रिंगणात आहेत. अंधारे, मिश्रा दोघेही नगरसेवक राहिले असून आझाद खान यांची पत्नी नगरसेवक राहिलेली आहे. त्यामुळे तिघेही अनुभवी नेते एकाच प्रवर्गात उभे आहेत.

Web Title: In front of the Grandmother in front of the Govt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.