पोलीस मुख्यालयासमोरच खुलेआम होते मद्य प्राशन!

By admin | Published: September 24, 2016 03:05 AM2016-09-24T03:05:22+5:302016-09-24T03:05:22+5:30

अकोला येथील वास्तव स्टिंग ऑपरेशनद्वारे उघडकीस.

In front of the police headquarters, openly drinking liquor! | पोलीस मुख्यालयासमोरच खुलेआम होते मद्य प्राशन!

पोलीस मुख्यालयासमोरच खुलेआम होते मद्य प्राशन!

Next

अकोला, दि. २३- पोलीस हे कायद्याचे रक्षक आहेत त्यामुळे अवैध व्यवसायीकांमध्ये त्यांची भिती व दरारा पाहिजे अकोल्यात मात्र तसा प्रकार नाही. पोलिसांच्या मुख्यालयासमोरच असलेल्या लक्झरी बसस्टँडवरील अनेक पानटपर्‍या, आमलेट सेंटर चालकांनी अवैधरीत्या मद्य प्राशन केंद्रच उघडले आहे. रात्रीच्या वेळेस या हातगाड्या, पानटपर्‍यांवर दारुड्यांचा मेळाच भरत असल्याचे चित्र ह्यलोकमतह्ण ने शुक्रवारी रात्री केलेल्या ह्यस्टिंग ह्णऑपरेशनच्या माध्यमातून समोर आले. पोलिसांच्या डोळय़ांदेखत अवैध धंदे चालत असतानाही, अद्यापपर्यंत एकाही व्यावसायिकाविरुद्ध पोलिसांनी कारवाई केली नाही किंवा त्याला प्रतिबंध घालण्याचा प्रयत्न सुद्धा केला नाही, हे विशेष.
कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याची आणि परिसरात कुठेही अवैध प्रकार चालत असतील तर त्याला आळा घालण्याचे काम पोलिसांचे आहे; परंतु पोलीस मुख्यालयासमोरच मद्यप्राशनाचा रात्रीस खेळ चाले, असा काही वर्षांपासून प्रकार सुरू आहे; परंतु पोलिसांनी या अवैध मद्य प्राशन केंद्रांकडे कधीच लक्ष दिले नाही. काही पोलीस कर्मचारीसुद्धा रात्रीच्या वेळी हातगाडी, आमलेट पाव सेंटर आणि पानटपरीवर येऊन मद्यप्राशनाचा आनंद लुटतात. रात्री ७ ते १0.३0 वाजताच्या सुमारास येथील आमलेट पाव सेंटर, पानटपरीवर अनेक जण दारूच्या बाटल्या घेऊन येतात आणि मित्रमंडळींसोबत दारूचा आस्वाद घेतात. येथील विक्रेतेसुद्धा त्यांना पाण्याच्या बाटल्या, पाऊच, थंड पेय, चकना पुरवितात. भर रस्त्यावर अनेक जण गाडी थांबवून काही क्षणातच दारू ढोसून निघून जात असल्याचे चित्रही सर्रास पाहावयास मिळते. पोलीस मुख्यालयासमोरच अवैध मद्य प्राशन केंद्रांवर सुरू असलेला प्रकार पोलिसांच्या नजरेतून सुटतो कसा?. जिल्हय़ात पोलीस ठिकठिकाणी अवैध दारू अड्डे, अवैध दारू विक्रेत्यांवर छापे घालतात. मग लक्झरी बसस्टँडवर पानटपरी, आमलेट पाव सेंटरवर चालणार्‍या अवैध दारू केंद्रांवर कारवाई करण्यास पोलीस का धजावत नाही? पोलिसांच्या दुर्लक्षामुळे पानटपरी चालक, आमलेट पाव सेंटरचालकांनी दारुड्यांसाठी मिनी वाइनबारच सुरू केल्याचे ह्यलोकमतह्ण ने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमधून स्पष्ट झाले आहे.

लक्झरी बसस्टँडवर प्रवासी सुरक्षा धोक्यात
लक्झरी बसस्टँडवर दररोज मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, औरंगाबाद, इंदौरला जाण्यासाठी शेकडो महिला, तरुणी, ज्येष्ठ नागरिक येतात. येथील अवैध मिनी वाइनबारमध्ये हे नागरिक कितपत सुरक्षित आहेत. एखाद्या दारुड्याने नशेत तर्र होऊन महिला, तरुणीची छेड काढण्याची किंवा अतिप्रसंग करण्याची शक्यता नाकारता येत नाही. या ठिकाणी दररोज किरकोळ स्वरूपाचे वादही होतात; परंतु याकडे सातत्याने दुर्लक्ष केल्यास एखादी अप्रिय घटना घडू शकते.
अनेक जण करतात अवैध दारूचा धंदा
इतर दिवसासोबतच ड्राय डेच्या दिवशी सुद्धा लक्झरी बसस्टँडवर काही पानटपरी, आमलेट पाव सेंटरवर देशी दारू, विदेशी दारू दुप्पट दराने विकल्या जात असल्याची माहिती एका ट्रॅव्हल्स संचालकाने दिली. याठिकाणी अवैध दारू विक्री होते. ही बाब पोलिसांपासून लपलेली आहे, असे नाही. पोलिसांना माहित असूनही आजपर्यंतही कोणतीही कारवाई झाली नाही. हे उल्लेखनिय.
ग्रीन नेट लावून बनविल्या 'परमिट रूम' !
लक्झरी बसस्टँडवरील काही पानटपरी चालक, आम्लेट पाव सेंटर चालकांनी दारुड्यांसाठी खास व्यवस्था केली आहे. त्यांना बसण्यासाठी पानटपरी, आम्लेट पाव सेंटरलगतच्या जागा बांबू, ताट्यांनी आवरून घेत, त्यावर ग्रीन नेट लावून एक प्रकारच्या रूमच तयार केल्या आहेत. या रूममध्ये बसून, चर्चांचे फड रंगवून दारूचा आस्वाद घेण्याची खास सोय करून ठेवली आहे. त्यामुळे शेकडो दारुडे वाइन बारऐवजी या रूममध्ये कोपरा शोधून मद्य प्राशनाचा कार्यक्रम आटोपताना दिसून येतात.
तुम्ही दारू आणा; आम्ही ग्लास, पाणी देतो!
पोलीस मुख्यालयासमोरील लक्झरी बसस्टँडवर पानटपरी, आम्लेट पाव सेंटर चालविणारेच दारुड्यांना दारू पिण्यासाठी टेबल, खुर्ची, पाण्याची बाटली, पाउच, थंड पेय आणि चकना पुरवित असल्याचे स्टिंग ऑपरेशनदरम्यान दिसून आले. वाइन बारमध्ये ५00 रुपये दिल्यापेक्षा या ठिकाणी २00 रुपयांमध्ये दारू पिण्यासह इष्टमित्रांसह चर्चासुद्धा रंगते. त्यामुळे गत काही महिन्यांपासून युवक या अवैध दारू अड्डय़ांवर गर्दी करीत आहेत.

Web Title: In front of the police headquarters, openly drinking liquor!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.