अकोल्याच्या व्यापा-याचे उमरखेड पोलीस ठाण्यासमोरच लुटले 11 लाख लुटले
By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2018 03:31 PM2018-06-29T15:31:40+5:302018-06-29T15:32:04+5:30
उमरखेड पोलीस ठाण्यासमोरील गजबजलेल्या रस्त्यावरून एका व्यापा-याची 10 लाख ७६ हजार रुपये असलेले बॅग दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी लंपास केली.
उमरखेड (यवतमाळ) : उमरखेड पोलीस ठाण्यासमोरील गजबजलेल्या रस्त्यावरून एका व्यापा-याची 10 लाख ७६ हजार रुपये असलेले बॅग दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी लंपास केली. ही घटना गुरुवारी रात्री 8 वाजताच्या सुमारास घडली. पोलीस या चोरट्यांचा शोध घेत आहे.
अकोला येथील महेश बाबूलाल अगरवाल हे व्यापा-यांची वसुली करण्यासाठी गुरुवारी उमरखेड येथे आले. दिवसभर केलेली वसुली घेऊन ते मुक्कामाच्या हिशोबाने येथील पोलीस ठाण्यासमोरुन गुरुवारी रात्री जात होते. त्यावेळी मोटरसायकलवरून आलेल्या दोन जणांनी भरधाव येऊन महेश यांच्या हातातील दहा लाख ७६ हजार रुपये असलेली बॅग हिसकावली. क्षणाचाही विलंब न लावता दोघे पसार झाले.
आरडाओरडा केल्याने काही नागरिकांनी या मोटरसायकल स्वारांचा पाठलाग केला.
परंतु ते सर्वांना गुंगारा देऊन पसार झाले. या घटनेची तक्रार उमरखेड पोलीस ठाण्यात देण्यात आली. व्यापा-याच्या फिर्यादीवरून दोन अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्या मार्गाने चोरटे पळाले त्या परिसरात हनुमान मंदिराजवळ सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहे. त्यावरून चोरट्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न पोलीस करत आहे.