महिलांचा पोलीस ठाण्यावर मोर्चा
By Admin | Updated: December 11, 2014 01:22 IST2014-12-11T01:22:12+5:302014-12-11T01:22:12+5:30
दारूबंदीसाठी चिखली तालुक्यातील महिलांचे आंदोलन.

महिलांचा पोलीस ठाण्यावर मोर्चा
चिखली(बुलडाणा) : गावात सर्रास होणारी गावठी व देशी दारूची अवैध विक्री, त्यामुळे लहान मुलांमध्ये बालपणापासूनच दारूची सवय लागणे, तर आनेकांचे संसार उध्वस्त होण्याबरोबच घराघरामध्ये भांडण तंटे या सर्व बाबीमुळे त्रस्त खंडाळा मकरध्वज येथील महिलांनी १0 डिसेंबर रोजी हिरकणी महिला उत्कर्ष प्रतिष्ठानच्या संस्थापक अध्यक्ष वृषालीताई बोंद्रे यांच्या नेतृत्वात चिखली पोलीस ठाणे आणि चिखली तहसील कार्यालय व दारूबंदी विभाग कार्यालयात प्रत्यक्ष जावून धडक देऊन दारूबंदीची मागणी केली.
हिरकणी महिला उत्कर्ष प्रतिष्ठाणच्या दारूबंदी उपक्रमात आता तालुक्यातील अनेक गावे समाविष्ठ होत असून गावोगावच्या महिला दारूबंदीसाठी पुढकार घेत आहेत. तालुक्यातील तेल्हारा, एकलारा, आंबाशी, गांगलगांव, माळशेंबा, सातगांव भुसारी, या गावच्या महिलांनी दारूबंदीसाठी विनेदने दिली आहेत. दरम्यान खंडाळा मकरध्वज येथील सुमारे २00 महिलांनी या मागणीसाठी वृषालीताई बोंद्रे यांच्या नेतृत्वात चिखली पोलीस स्टेशन चिखली तहसिल कार्यालय, आणी दारूबंदी विभाग यांना निवेदन दिले व तातडीणे कार्यवाही करण्याची मागणी केली. विशेष म्हणजे खंडाळा मकरध्वज येथील चिखली ग्रामसंजीवनी योजनेतील सहभागासाठी आमदार राहुल बोंद्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत विशेष ग्रामसभा दिनांक २२ नोव्हेंबर रोजी बोलवण्यात आली होती, त्या सभेतही गावातील महिलांनी आक्रमकपणे दारूबंदीचा विषय मांडला आणि खंडाळा मकरध्वज येथे दारूबंदी करण्यात यावी असा ठराव मांडून सर्वानुमते तो मंजुरही करून घेतला होता. यानुषंगाने खंडाळा मकरध्वज येथून आलेल्या महिला या प्रश्नावर अत्यंत आक्रमक दिसून आल्या, गावातील दारू विक्री बंद व्हावी यासाठी गावात अवैध व्यवसाय करणारे लोकांचे इत्यंभुत माहिती त्यांनी पोलीस स्टेशनला व दारूबंदी विभागाला दिली. या नंतरही गावातील अवैध दारू विक्री बंद न झाल्यास उपोषणाचा ईशारा या निवेदनाव्दारे दिला.