शेतांमध्ये गोठले पाणी!

By admin | Published: December 19, 2014 01:04 AM2014-12-19T01:04:10+5:302014-12-19T01:04:10+5:30

अकोल्यातील प्रकार : बघ्यांची गर्दी

Frozen water in the fields! | शेतांमध्ये गोठले पाणी!

शेतांमध्ये गोठले पाणी!

Next

पिंजर (अकोला) : पाऊस पडला नाही, ढगाळ वातावरण नाही, फक्त कमालीची थंडीचा कडाका वाढला असताना, अकोला जिल्ह्यातील निंबी खुर्द येथील नदीकाठच्या शेतांमध्ये पाणी गोठून बर्फाचे जाड पापुद्रे तयार झाल्याचा प्रकार १८ डिसेंबर रोजी घडला. गावात या प्रकाराची माहिती वार्‍यासारखी पसरून, ग्रामस्थांनी एकच गर्दी केली.
बार्शिटाकळी तालुक्यातील निंबी खुर्द येथील माजी सरपंच नागोराव चव्हाण हे १८ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजताच्या सुमारास शेतात कुटार आणण्यास गेले असता, त्यांना शेतात जमिनीवर चपातीच्या आकाराचे, थोडे लांबसर बर्फाचे पापुद्रे विखुरलेले आढळले. त्यापैकी काही बर्फाचे पापुद्रे त्यांनी सोबत घेऊन गाव गाठले. ते पाहून गावातील काही मंडळीनी शेताकडे धाव घेतली. या प्रकाराची चर्चा परिसरातील गावांमध्ये पसरून, तेथील लोकांनीही चव्हाण यांच्या शेताला भेट दिली. त्यांना शेजारील शेतांमध्येही असेच बर्फाचे पापुद्रे जमिनीवर आढळून आले.
यावर कृषी विद्यसपीठाचे कृषी हवामानशास्त्रज्ञ डॉ.संजय वंजारी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रत्यक्ष गारा अथवा पाऊस पडल्यानंतर किंवा तापमान शून्य डिग्री सेल्सिअसपेक्षा खाली गेल्याशिवाय असे घडू शकत नसल्याचे स्पष्ट करून असा प्रकार घडलेल्या शेतात प्रत्यक्ष गेल्याशिवाय व तेथील स्थितीचा अभ्यास केल्याशिवाय ते नेमके कशामुळे झाले याबाबत आपण खात्रीने सांगू शकत नसल्याचे स्पष्ट केले.

*४.४४ अंश सेल्सिअसलाच होते पाणी गोठण्याची प्रक्रिया सुरु
हिवाळ्य़ात जलसाठे वातावरणात उर्जा उत्सर्जित करतात. त्यामुळे पृष्ठभागानजिकचे पाणी थंड होते. थंड झाल्यामुळे त्याचे घनत्व वाढते आणि ते तळाशी जाते. एकदा का पृष्ठभागावरील पाण्याचे तापमान २ अंश सेल्सिअसच्या खाली गेले, की ते गोठायला सुरुवात होते. पाणी गोठण्यासाठी त्याचे तापमान शून्य अंश सेल्सिअसपर्यंतच खाली जाणे आवश्यक नसते. पाणी गोठण्याची प्रक्रिया सुरू होण्यासाठी पृष्ठभागापासून तळापर्यंतच्या पाण्याचे तापमान ४.४४ अंश सेल्सिअसपर्यंत पोहाचेणे आवश्यक असते. ही प्रक्रिया सर्वप्रथम काठालगतच होऊ शकते.

Web Title: Frozen water in the fields!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.