फळे कवडीमोल; टरबूज ३, तर आंबा १० रुपयांत किलोभर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 04:18 AM2021-05-10T04:18:48+5:302021-05-10T04:18:48+5:30
--बॉक्स-- ७५ टन टरबूज, खरबुजाची कमी दरात विक्री बाजारात ३० रुपये किलो विकले जाणारे टरबूज, खरबूज ठोकमध्ये १० रुपये ...
--बॉक्स--
७५ टन टरबूज, खरबुजाची कमी दरात विक्री
बाजारात ३० रुपये किलो विकले जाणारे टरबूज, खरबूज ठोकमध्ये १० रुपये किलो विकले गेले. रविवारी बाजारात जवळपास ७५ टन माल उतरला होता. व्यापाऱ्यांनी हा सर्व माल विकला असल्याचे सांगितले.
--बॉक्स--
दोन हजार पेटी आंब्यांची आवक
रविवारी बाजारात दोन हजार पेटी आंब्यांची आवक झाली होती. यामधील बहुतांश माल किरकोळ विक्रेत्यांकडे शिल्लक आहे. काही फळ विक्रेत्यांनी खराब होण्याच्या भीतीने कमी दरात आंब्यांची विक्री केली.
--कोट--
भाजीपाला मोठ्या प्रमाणात शिल्लक आहे. रविवारी काही भाजीपाला विकला गेला; परंतु बटाटे, कांदे व इतर भाजीपाला विकला गेला नाही. त्यामुळे आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे.
- गणेश लोंदे, भाजीपाला विक्रेता
--कोट--
निर्बंधांच्या निर्णयाआधी मोठ्या प्रमाणात भाजीपाला घेऊन ठेवला होता. रविवारी काही विकला. आता हजार ते १२०० रुपयांचा माल शिल्लक आहे. भाजीपाला विक्री बंद असल्याने हा पूर्ण भाजीपाला सडणार आहे.
- रणजित सिकची, भाजीपाला विक्रेता
--कोट--
जवळपास २ क्विंटल माल शिल्लक आहे. यामध्ये बहुतांश माल आंब्याचा आहे. हा माल आता पडून राहणार असून, खराब होण्याची भीती आहे. मालाच्या विक्रीसोबत खर्चाचीही अडचण निर्माण होणार आहे.
- दिलीप सोनोने, फळांचे विक्रेता
--कोट--
निर्बंधांचा आदेश येण्याआधी नवीन माल मागविला होता. शनिवारी येणारा आंब्यांचा माल रविवारी आला. आता दोन ते अडीच क्विंटल माल पडून आहे. आंबे घरी सडल्यापेक्षा काही माल उधारीवर दिला आहे.
- अशोक ताले, फळांचे विक्रेता
--कोट--
कडक निर्बंधांमध्ये फळ व भाजीपाला विक्री बंद आहे. त्यामुळे आता बाजारात मालाची आवक होणार नाही. रविवारी काही माल आला. यामध्ये मात्र शेतकऱ्यांची मोठी अडचण झाली आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडे भाजीपाला व फळे शिल्लक आहेत.
- मुजाहीद खान, फळांचे व्यापारी