रस्त्यावरच फळांची दुकाने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:14 AM2021-06-22T04:14:07+5:302021-06-22T04:14:07+5:30
.............................. भाजपतर्फे मास्क वाटप अकोला : भाजपतर्फे दक्षिण मंडळ अध्यक्ष गणेशभाऊ अंधारे यांच्या नेतृत्वात शहराच्या मंडळातील विविध भागात मास्कचे ...
..............................
भाजपतर्फे मास्क वाटप
अकोला : भाजपतर्फे दक्षिण मंडळ अध्यक्ष गणेशभाऊ अंधारे यांच्या नेतृत्वात शहराच्या मंडळातील विविध भागात मास्कचे वाटप करण्यात आले. या वेळी मंडळ अध्यक्ष गणेशभाऊ अंधारे, नगरसेवक धनंजय धबाले, मंडळ सरचिटणीस गोपाल मुळे, प्रफुल्ल कानकिरड, युवा मोर्चा मंडळ अध्यक्ष रितेश जामनारे उपस्थित हाेते.
......................................
सैनिक कॅन्टीनचे काउंटर वाढवा
अकोला : भारतीय सैन्यात कार्यरत व निवृत्त झालेल्या सैनिकांकरिता अकोल्यात सुरू असलेल्या सैनिक कॅन्टीनचे काउंटर वाढविण्याची मागणी ग्रामीण युवा संघटना जिल्हाध्यक्ष उमेश इंगळे यांनी केली आहे.
................................................
शेतकऱ्यांच्या याद्या अद्ययावत करा!
अकोला : प्रधानमंत्री किसान सन्माननिधी योजनेेंतर्गत जिल्ह्यातील लाभार्थी शेतकऱ्यांच्या यादीतील त्रुटींची दुरुस्ती करून याद्या अद्ययावत करण्याचे काम तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी सातही तहसील कार्यालयांच्या संबंधित नायब तहसीलदारांना दिले आहेत.
............
सातवा वेतन आयोग; शिक्षक वंचित!
अकोला : राज्य शासनाने शिक्षकांना सातवा वेतन आयोग लागू केला आहे. मात्र, कालबद्ध पदोन्नती व आश्वासित प्रगती योजनांपासून अनेक कर्मचारी वंचित असल्याचा आरोप महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी संघटनेने केला आहे. त्यासंदर्भात राज्य शासनाने लक्ष देऊन शिक्षकांना लाभ द्यावा, अशी मागणी होत आहे.
---------------------------
रस्त्यांवर गर्दी कायमच!
अकोला : कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग नियंत्रित करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात जमावबंदी आणि रात्री कडक निर्बंध लागू करण्यात आले; मात्र शहरातील बाजार परिसर तसेच विविध सार्वजनिक ठिकाणी रस्त्यांवर नागरिकांची होणारी गर्दी कायमच असल्याचे चित्र सोमवारी दिसून आले.
कृषीसेवक, रोहयो कर्मचाऱ्यांना विमा संरक्षण द्या!
अकोला : शासनाने अद्यापही कृषी अधिकारी, कर्मचारी तसेच काही शासकीय कर्मचाऱ्यांसह रोजगार सेवकांना कोरोना संकटात विमा सुरक्षेचे कवच दिलेले नाही. त्यामुळे रोहयोची कामे करताना जिल्ह्यात कोणाचा मृत्यू झाल्यास शासन त्याची जबाबदारी घेणार काय, असा प्रश्नही ग्रामसेवक, कृषी सहायक, पंचायत समिती रोहयो विभागातील कार्यरत अधिकारी, कर्मचारी, वनरक्षक, रोजगार सेवक करू लागले आहेत.
उड्डाणपूल अर्धवट स्थितीत
अकोला : डाबकी रोड, रेल्वेगेटवरील उड्डाणपुलाचे काम सुरू आहे; मात्र हे काम अद्यापही अर्धवट स्थितीत असून पूर्णत्वास न गेल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे या उड्डाणपुलाचे काम तत्काळ पूर्ण करण्याची मागणी होत आहे.
नेमून दिलेल्या जागेवरच व्यवसाय करा
अकोला : नेमून दिलेल्या जागेव्यतिरिक्त इतर ठिकाणी प्रतिबंधित क्षेत्रामध्ये व्यवसाय करीत असल्याचे आढळून आल्यास प्रशासनाकडून कोराेना नियमांचे उल्लंघन करीत असल्याचे गृहीत धरून कठोर कारवाई करण्यात येईल, असे आदेश महापालिका प्रशासनाने दिले आहेत.
काेराेना नियमांचे पालन करा
अकाेला : महानगरात कोरोना विषाणूचा वाढत असलेला प्रादुर्भाव लक्षात घेता शहरातील नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंग नियमाचे काटेकोरपणे पालन करणे तसेच मास्क आणि सॅनिटायरझरचा वापर करून तसेच प्रशासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करून कोरोनाला आळा घालण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
रस्ता खाेदला; काम बंद !
अकाेला : जुने शहरातील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मैदानालगतच्या प्रमुख रस्त्याची दुरवस्था झाली हाेती. काही दिवसांपूर्वी या रस्त्याच्या दुरुस्तीला प्रारंभ करण्यात आला़ जेसीबीने रस्ता खाेदून काढल्यानंतर ताबडताेब काम सुरू हाेईल, अशी अपेक्षा असताना मागील अनेक दिवसांपासून रस्त्याचे काम बंद करण्यात आल्यामुळे स्थानिक रहिवासी त्रस्त झाले आहेत़
नायगाव परिसरात पाणीटंचाई
अकोला :‘अमृत’ योजनेंतर्गत पाणीपुरवठा वितरण प्रणालीत जुन्या जलवाहिन्यांच्या बदल्यात नवीन जलवाहिन्या टाकल्या जात असून पाण्याचे काटेकोर नियोजन करण्यासाठी नळांना मीटर लावले जात आहेत. दुसरीकडे प्रभाग १ मधील नायगाव परिसरात पाणीटंचाई निर्माण झाली असून नागरिकांना भटकंती करावी लागत आहे़
बसस्थानक परिसरात वाहनांचे अतिक्रमण
अकाेला : शहरात निर्माणाधीन उड्डाणपुलाच्या कामामुळे मध्यवर्ती बस स्थानकात जाणाऱ्या एसटी चालकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. काेराेनामुळे प्रवाशांनी एसटीकडे पाठ फिरवल्याचे चित्र असून अशा स्थितीत बसस्थानक परिसराला अवैध वाहनधारकांनी विळखा घातल्याची बिकट परिस्थिती आहे. या समस्येकडे वाहतूक शाखेने लक्ष देण्याची गरज आहे़
‘लसीकरणाच्या ठिकाणी सुविधा द्या !’
अकाेला : काेराेना विषाणूचा सामना करण्यासाठी शहरात महापालिकेच्या वतीने लसीकरण केंद्रे उघडण्यात आली आहेत. या ठिकाणी ४५ वर्षांवरील सर्वच नागरिकांना लस घेता येत आहे. दरम्यान, लसीकरणाच्या ठिकाणी बसण्यासाठी पर्यायी व्यवस्था करण्यासाेबतच उन्हापासून संरक्षण व पिण्याचे पाणी आदी सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी मनपाकडे करण्यात आली आहे.
‘महामार्गाची तातडीने दुरुस्ती करा !’
अकाेला : शिवनी ते नेहरू पार्क चाैक ते खदान पाेलीस ठाणे ते बाबासाहेब धाबेकर फार्महाउसपर्यंत निर्माणाधीन मिनी हायवेच्या कामाची गती मंदावली आहे. सिमेंट रस्त्याचे रुंदीकरण हाेत असताना वाशिम बायपास चाैक, गुरांचा बाजार, मानव शाेरूम तसेच निमवाडी चाैकात रस्त्याचे काम अर्धवट स्थितीत असून या मार्गाची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.