समाजसेवेचे फळ निश्चित मिळते : तिमांडे महाराज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2020 04:34 AM2020-12-16T04:34:00+5:302020-12-16T04:34:00+5:30
पातुरातील राष्ट्रसंत सेवाश्रम येथे सोमवारी संत ज्ञानेश्वर, संत तुकडोजी महाराज पुण्यतिथी महोत्सवप्रसंगी समारोपीय काल्याचे कीर्तन करताना ते बोलत होते. ...
पातुरातील राष्ट्रसंत सेवाश्रम येथे सोमवारी संत ज्ञानेश्वर, संत तुकडोजी महाराज पुण्यतिथी महोत्सवप्रसंगी समारोपीय काल्याचे कीर्तन करताना ते बोलत होते.
तिमांडे महाराज यांनी प्रत्येकाने जाती, धर्मांबद्दल आदर ठेवावा तरच, जाती-पंथातील असलेले भेद दूर होतील. हिंदू, मुस्लीम, बौद्ध, ख्रिश्चन यांनी धर्माप्रमाणे प्रार्थना करून सर्वांनी एक होऊन अन्यायाप्रति चीड व्यक्त करावी. संत ज्ञानेश्वर यांनी पंढरपुरामध्ये सर्वधर्मीयांना एकत्र करून गोपालकाला केला. संत तुकडोजी महाराजांनी सुद्धा सर्वधर्मीयांनी एक होऊन प्रार्थना करावी हेच सांगितले आहे. आश्रमामध्ये प्रशिक्षित १६ कीर्तनकारांनी प्रबोधन केले. आध्यात्मिक सोहळ्याची घटस्थापना विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष संत तिमांडे महाराज यांच्या उपस्थितीत उपाध्यक्ष संजय पाटील, शालिनी पाटील यांनी केली. महोत्सवात प्रात: ध्यान, ग्रामगीता पारायण, कीर्तन यांचा समावेश होता. कार्यक्रमाला वर्षा अटायकर, नर्मदा गाडगे, नंदा इंगळे,अरविंद भाजीपाले, रवींद्र अटायकर, दिलीप खाकरे, माला भाजीपाले, निशा गाडगे, योगीता उमाळे, रूपाली येनकर, बालकीर्तनकार प्रार्थना अटायकर, शोभा कोथळकर यांनी ग्रामगीतेवर प्रबोधन केले. १२ डिसेंबरला सदर पुण्यतिथी सोहळ्याचा समारोप करण्यात आला. कार्यक्रमांमध्ये कवळेश्वर भजन मंडळाचे हार्मोनियम वादक भावेश गिरोलकर, तबलावादक गोपाल गिरोलकर, सुहास देवकर, जयवंत पुरुषोत्तम, रमेश कोथळकर, मनोज इंगळे आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमामध्ये संत ज्ञानेश्वर कलाप्रतिष्ठानचे निवृत्त नायब तहसीलदार भास्करराव कळाशीकर डॉ.मदन नालीनदे, महाराज संत सिदाजी महाराज भजन मंडळाचे प्रा. विलास राऊत, संजय राऊत, काळपांडे गुरुजी, विष्णू बापू, गिरे त्यांचा संच यांनी भजने गाऊन सेवा दिली.
फोटो: