नागपूर हत्याकांडातील फरार आराेपी अकाेल्यात जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2020 08:14 PM2020-12-05T20:14:07+5:302020-12-05T20:14:19+5:30
Akola Crime News आराेपी रुग्णालयातून पाेलीसांच्या हातावर तुरी देउन फरार झाला हाेता.
अकाेला : नागपूर शहरातील सक्करदारा पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील एका इसमाची हत्या केल्यानंतर पाेलीसांनी अटक करून कारागृहात असलेला आराेपी प्रकृती रुग्णालयातून पाेलीसांच्या हातावर तुरी देउन फरार झाला हाेता. त्याला आकाेट फैल व नागपूर पाेलीसांनी संयुक्तरीत्या कारवाइ करीत गुडधी परिसरातुन अटक केली. त्याला घेउन नागपूर पाेलीस रवाणा झाले आहेत.
सक्करदरा परिसरात एका इसमाची वाजीद अहेमद उर्फ बंबइया अब्बास अली यांची २०१४ मध्ये हत्या केली हाेती. त्यानंतर आराेपी फरार झाला हाेता, तब्बल ६ वर्षांनी म्हणजेच ऑक्टाेबर २०२० मध्ये या आराेपीला अटक करण्यात नागपूर पाेलीसांना यश आले. मात्र कारागृहात असतांना या आराेपीची प्रकृती खालावल्याने त्याला नागपूर रुग्णालयात ठेवण्यात आले हाेते. या दरम्यान आराेपी पाेलीसांच्या हातावर तुरी देउन फरार झाला हाेता. त्यामुळे अजनी पाेलीस ठाण्याच्या त्याच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. हा आराेपी अकाेल्यात असल्याची माहीती आकाेट फैल पाेलीसांना मिळाली. यावरुन आकाेट फैलचे ठाणेदार महेंद्र कदम यांनी गुन्हे शाेध पथकातील कर्मचाऱ्यांना कामाला लावले. आराेपी गुडधी परिसरात हा बांधकामावर काम करीत असल्याची माहिती मिळताच त्याला आकाेट फेल पाेलीसांनी अटक केली. त्यानंतर नागपूर पाेलीस आराेपीला घेउन रवाणा झाले आहेत. ही कारवाइ सुनील टाेपकर, शेख अस्लम, श्रीकांत पवार, दीलीप इंगाेले व संजय पांडे यांनी केली. त्याना नागपूर पाेलीसानी सहकार्य केले.
तीन पाेलीस कर्मचारी निलंबीत
अजनी पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील एका शासकीय रुग्णालयातून आराेपी फरार झाला हाेता. यावेळी कार्यरत असलेल्या तीन पाेलीस कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीमुळे आराेपी पळाल्याचे समाेर आल्यानंतर नागपूर पाेलीस अधीकाऱ्यांनी तीन पाेलीस कर्मचाऱ्यांना निलंबीत केले हाेते. मात्र आता आराेपीला अटक केल्यामूळे या कर्मचाऱ्यांना कार्यरत करण्यात येणार असल्याची माहिती आहे.