मूल्यांकन पद्धतीमुळे पाेलीस ठाण्यांचे कामकाज सकारात्मक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2021 04:13 AM2021-01-01T04:13:53+5:302021-01-01T04:13:53+5:30

सचिन राऊत अकाेला : जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस स्टेशनचे कामकाज सुधारण्यासाठी तसेच कामकाज गुणवत्तापूर्ण पद्धतीने करून पाेलिसांमध्ये सकारात्मक संदेश देण्यासाठी ...

The functioning of the police stations is positive due to the assessment system | मूल्यांकन पद्धतीमुळे पाेलीस ठाण्यांचे कामकाज सकारात्मक

मूल्यांकन पद्धतीमुळे पाेलीस ठाण्यांचे कामकाज सकारात्मक

Next

सचिन राऊत

अकाेला : जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस स्टेशनचे कामकाज सुधारण्यासाठी तसेच कामकाज गुणवत्तापूर्ण पद्धतीने करून पाेलिसांमध्ये सकारात्मक संदेश देण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या संकल्पनेतून जिल्हयातील प्रत्येक पाेलीस ठाण्याच्या मूल्यांकन सुरू करण्यात आले आहे. या मूल्यांकन पद्धतीमध्ये उत्कृष्ट आणि दर्जेदार कामकाज करणाऱ्या तीन पाेलीस ठाण्यांना क्रमांक देऊन त्यानंतर आएसओ मानांकनासाठी त्या ठाण्यांचे नाव प्रस्तावित करण्यात येत आहे.

पोलीस ठाण्यांमध्ये येणाऱ्या तक्रारदारांचे समाधान करण्यासाठी तसेच गुणवत्तापूर्ण सेवा पोलीस खात्याकडून प्रदान व्हावी या उद्देशाने जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस स्टेशनच्या कामकाजाची माहिती घेऊन त्यांचे मूल्यांकन करण्यात येत आहे. पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्याअंतर्गत एक पथक कार्यान्वित करून ते पोलीस ठाण्याचे मूल्यांकन करीत आहेत. सप्टेंबर महिन्यापासून या कामकाजाची सुरुवात करण्यात आली असून, पहिल्याच टप्प्यात मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस स्टेशन, बार्शीटाकळी पोलीस स्टेशन व अकोट ग्रामीण पोलीस स्टेशनचा अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक आले आहेत. त्यामुळे या पाेलीस ठाण्यांची कामगिरी सुधारली असून, त्याचे परिणाम सकारात्मक असल्याचे दिसून येत आहे.

याप्रक्रियेतून हाेेते मूल्यांकन

पाेलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी सुरू केलेल्या मूल्यांकन पद्धतीमध्ये गुन्हे नियंत्रण, गुन्हे प्रकटीकरण, कायदा व सुव्यवस्था अंमलबजावणी, कम्युनिटी पोलिसिंग, सीसीटीएनएसचा पोलीस कामकाजामध्ये यथोचित उपयोग करून घेणे व सीसीटीएनएसचा वापर हा पोलीस प्रशासनाकडून कशाप्रकारे करण्यात येत आहे. या सर्व बाबींचे मूल्यांकन करण्यात येते. पाेलीस अधीक्षकांचे एक पथक या बाबी तपासून ही प्रक्रिया पूर्ण केली किंवा नाही याची चाचपणी करते.

यापद्धतीनुसार मिळताे क्रमांक

जिल्ह्यातील प्रत्येक पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील गुन्हे शोध व प्रतिबंधात्मक कारवाई करून गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवणे या सर्व कामगिरीवर त्या पोलीस स्टेशनला प्रथम द्वितीय आणि तृतीय असे तीन क्रमांक देण्यात येत आहेत. पोलीस स्टेशनचे प्रशासन कशाप्रकारे काम करत आहे. या सर्व कामकाजाचा अभ्यास करून त्यांचे मूल्यांकन करून त्यांना कामकाजानुसार क्रमांक देण्यात येत असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.

–-------------------

Web Title: The functioning of the police stations is positive due to the assessment system

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.