सूक्ष्म सिंचन संचाचा निधी रखडला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2019 06:35 PM2019-04-13T18:35:34+5:302019-04-13T18:35:37+5:30

अकोला : सूक्ष्म सिंचन योजनेंतर्गत शेतकऱ्यांना देण्यात येणाºया ठिबक, तुषार संचाचे ४०० कोटींच्यावर अनुदान रखडले असून, यावर्षी २ लाख ३९ हजार ७३९ शेतकºयांनी या योजनेसाठी आॅनलाइन नोंदणी केली.

Fund of Micro irrigation set pending | सूक्ष्म सिंचन संचाचा निधी रखडला!

सूक्ष्म सिंचन संचाचा निधी रखडला!

Next

अकोला : सूक्ष्म सिंचन योजनेंतर्गत शेतकऱ्यांना देण्यात येणाºया ठिबक, तुषार संचाचे ४०० कोटींच्यावर अनुदान रखडले असून, यावर्षी २ लाख ३९ हजार ७३९ शेतकºयांनी या योजनेसाठी आॅनलाइन नोंदणी केली. मार्चअखेर प्रत्यक्षात ५४ हजार ६५६ शेतकºयांच्याच अर्जाची तपासणी करण्यात आली.
शेतकºयांनी सूक्ष्म सिंचन अर्थात ठिबक व तुषार सिंचन पद्धतीचा वापर करण्यासाठी केंद्र शासनाने सूक्ष्म सिंचन योजना सुरू केली आहे. यासाठी केंद्र व राज्य सरकारकडून शेतकºयांना अनुदान दिले जाते; परंतु या योजनेचे अनुदान मिळण्यासाठी शेतकºयांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. यावर्षी या योजनेसाठी जवळपास ६५० कोेटी रुपये मंजूर करण्यात आले आहे; परंतु अर्जाची तपासणी बघता आतापर्यंत केवळ दीडशे ते दोनशे कोटी रुपयांचेच अनुदान शेतकºयांना देण्यात आले.
योजना सुरू झाली तेव्हा शेतकरी संच खरेदी करायचे. या संचाची रक्कम कंपनीच्या नावाने निघायची. आता मात्र यात बदल करण्यात आला असून, अनुदानाची रक्कम थेट शेतकºयांच्या बँक खात्यात जमा करण्यात येत आहे. या योजनेंतर्गत ज्या शेतकºयांना संच खरेदीची पूर्वसंमती देण्यात येते, ते शेतकरी सूक्ष्म सिंचनासाठी लागणारे पाइप, तुषार, ठिबक व इतर संच करू न शेतकरी गुंतवणूक करतात. म्हणूनच त्यांना अनुदान वेळेवर मिळावे, अशी अपेक्षा आहे.
दरम्यान, पावसाची अनिश्चितता बघता, शेतकºयांचा कल सूक्ष्म सिंचन योजनेकडे वाढला असून, मागील तीन-चार वर्षांच्या तुलनेत यावर्षी या योजनेसाठीच्या अर्जाची मागणी वाढल्याचे चित्र आहे. इतर पिकांसह शेतकरी आता फळझाडे, कापूस पिकालाही ठिबक, तुषार संचाद्वारे सिंचन करीत आहेत.

- सूक्ष्म सिंचन योजनेंतर्गत अकोला तालुक्यातील ४८२ शेतकºयांनी ठिबक, तुषार संचासाठी अर्ज केले होते. त्यातील २७२ शेतकºयांना अनुदान देण्यात आले.
नरेंद्र शास्त्री, कृषी अधिकारी, अकोला.

 

Web Title: Fund of Micro irrigation set pending

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.