फुंडकर यांची जयंती साजरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 04:22 AM2021-08-22T04:22:48+5:302021-08-22T04:22:48+5:30
भाजपा नेते तथा माजी कृषिमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या जयंतीनिमित्त आ. हरीश पिंपळे यांच्या कार्यालयात अभिवादन करण्यात आले. यावेळी ...
भाजपा नेते तथा माजी कृषिमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या जयंतीनिमित्त आ. हरीश पिंपळे यांच्या कार्यालयात अभिवादन करण्यात आले. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष भूषण कोकाटे, भाजपा शहराध्यक्ष रितेश सबाजकर, भाजपा शहर बुथप्रमुख कमलाकर गावंडे, भाजयुमो तालुकाध्यक्ष पप्पू पाटील मुळे, कोमल तायडे, गजानन पोळकट, गजानन नाकट, राजेंद्र इंगोले, बबलू भेलोंडे, राम जोशी, प्रदीप अवघाते, कुलदीप सदार, अतुल इंगोले, मकरंद पाटोळे, ऋषिकेश वारे, विलास सावळे, सुधीर दुबे, योगेश फुरसुले, गणेश ठाकरे, ज्ञानेश महामुने यांची उपस्थिती होती.
--------------------
सुरक्षित फवारणी रथाचे उद्घाटन
अकोला : महाराष्ट्र शासन कृषी विभाग व एफएमसी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने सुरक्षित फवारणी अभियानातर्गंत सुरक्षित फवारणी रथाचे उद्घाटन नुकतेच जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयासमोर करण्यात आले. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कांतप्पा खोत, जिल्हा कृषी विकास अधिकारी जि.प. मुरली इंगळे, शत्रुघ्न उपर्वट, निखिल मुरमकार, सुमित मोहोड, राजेश इंगोले आदी उपस्थित होते.
-----------------------------------------
कृषिदूताने राबवली पशू लसीकरण मोहीम
अकोट : अकोट तालुक्यातील बोर्डी येथे नुकताच जनावरांच्या विविध रोगांवर लसीकरण कार्यक्रम राबविण्यात आला. यावेळी डॉ. राजेंद्र गोडे कृषी महाविद्यालयाच्यावतीने ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत जनावरांवर होणारे विविध संसर्गजन्य आजार विविध रोगांची लक्षणे व त्यावर करण्यात येणाऱ्या विविध उपाययोजना, कृत्रिम रेतन या विषयावर पशुवैद्यकीय डॉ. पी. एम. खोडवे यांच्याकडून मार्गदर्शन व माहिती देण्यात आली.
या कार्यक्रमात डॉ. राजेंद्र गोडे कृषी महाविद्यालय बुलडाणाचे प्राचार्य डॉ. आर. यू. वाघ, प्रा. प्रणाली काळमेघ, कार्यक्रमाधिकारी प्रा. व्ही. एस. गायकवाड यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमात गावकऱ्यांसह कृषिदूत ऋषिकेश संजय ताडे यांनी मोहीम यशस्वी राबवली.