श्रीराम मंदिरासाठी विदर्भातील १२,५०० गावांमधून निधी संकलन करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:46 AM2021-01-13T04:46:00+5:302021-01-13T04:46:00+5:30

अभियानाबाबत अधिक माहिती देताना शेंडे म्हणाले की, संपूर्ण देशातून निधी संकलित करण्यासाठी चार लाख गावांमध्ये जाण्याचा निर्णय घेण्यात आला ...

Funds will be collected from 12,500 villages in Vidarbha for the Shri Ram Temple | श्रीराम मंदिरासाठी विदर्भातील १२,५०० गावांमधून निधी संकलन करणार

श्रीराम मंदिरासाठी विदर्भातील १२,५०० गावांमधून निधी संकलन करणार

Next

अभियानाबाबत अधिक माहिती देताना शेंडे म्हणाले की, संपूर्ण देशातून निधी संकलित करण्यासाठी चार लाख गावांमध्ये जाण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये जवळपास १६ कोटी कुटुंबांशी संपर्क साधण्यात येणार आहे. विदर्भातही १२,५०० गावांमधील कुटुंबांपर्यंत पोहोचण्यासाठी १५ जानेवारीपासून अभियानाची सुरुवात होणार आहे, असे शेंडे यांनी सांगितले. तब्बल १०८ एकर क्षेत्रावर होणार असलेल्या मंदिरासाठी दोन हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. निर्माणकार्य सुरू झाल्यापासून अंदाजे साडेतीन वर्षांच्या कालावधीत हे काम पूर्णत्वास जाईल, असेही त्यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला अकोला विभागाचे संघचालक प्रा. नरेंद्र देशपांडे, महानगर संघचालक गोपाल खंडेलवाल, प्रांत कोषाध्यक्ष राहुल राठी, प्रांत सेवा प्रमुख गणेश कालकर, विश्व हिंदू परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश लोढिया, बजरंग दल विभाग संयोजक सूरज भगेवार उपस्थित होते.

राजकीय पक्षांच्या निधीचेही वावडे नाही

श्रीराम मंदिर निर्माणासाठी देशातील प्रत्येकाचा हातभार लागावा यासाठी निधी संकलन अभियान सुरू करण्यात आले आहे. मंदिरासाठी राजकीय पक्षांनी समर्पण निधी देऊ केला तर तोदेखील स्वीकारण्यात येइल, असेही गोविंद शेंडे यांनी स्पष्ट केले.

Web Title: Funds will be collected from 12,500 villages in Vidarbha for the Shri Ram Temple

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.