कोरोना काळात केले २२०० मृतदेहांवर अंतिम संस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 04:23 AM2021-08-20T04:23:19+5:302021-08-20T04:23:19+5:30
अकोला : कोरोना महामारीच्या काळात स्वतःचे प्राण धोक्यात घालून २२०० मृतदेहांवर अंतिम संस्कार करणारे जावेद जकारिया व त्यांच्या ...
अकोला : कोरोना महामारीच्या काळात स्वतःचे प्राण धोक्यात घालून २२०० मृतदेहांवर अंतिम संस्कार करणारे जावेद जकारिया व त्यांच्या चमुचा राष्ट्रवादी काँगेस पार्टीतर्फे मुंबईत गुरूवारी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष ना. जयंत पाटील यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.
राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे राष्ट्रीय महासचिव जावेद जकारिया यांनी एक टीम तयार करून १० एप्रिल २०२० पासून अंतिमसंस्काराच्या कार्याला प्रारंभ केला. हे कार्य आजही सुरू आहे. आतापर्यंत २२०० मृतदेहांवर त्यांनी अंतिम संस्कार केले. जावेद जकारिया यांच्यासह तनवीर खान, वसीम खान, शेख नदी, समरी खान, जावेद खान, महफुजखान, सैय्यद सफदर अली, वजिद खान, मौजुद यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी अल्पसंख्याक विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष शब्बीर अहमद विध्रोही यांच्या प्रेरणेमुळे आपण हे कार्य करीत असल्याचे जावेद जकारिया यांनी सांगितले. कार्यक्रमाला प्रदेश महासचिव शिवाजीराव गर्जे, राष्ट्रीय अध्यक्ष शब्बीर अहमद विध्रोही उपस्थित होते.