बाजारपेठेत फर्निशिंगची धामधूम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2017 01:43 PM2017-10-01T13:43:07+5:302017-10-01T13:43:07+5:30
अकोला: दिवाळीत होणाºया साफसफाईसोबतच गृहसजावटीच्या वस्तूंची खरेदी आणि घरातील जुन्या सोफासेट, दिवानची फर्निशिंग जोरात आहे. त्यातही कर्टन आणि अपव्होल्स्ट्रीमध्ये इम्पोर्टेंड कापडांना अधिक मागणी असून, त्यामित्ताने अकोल्यातील हॅन्डलूम्सची बाजारपेठ सजली आहे.
दिवाळीच्या निमित्ताने सुरू झालेल्या गृहसजावटीसाठी सोफासेटचे कुशन, आॅफिस, घरादारातील पडदे, बेडशीट-लीनेन, कारपेट, कार कुशन, गाद्या, चादर, पिलोज, पायपोसची खरेदी मोठ्या प्रमाणात केली जाते. या खरेदीवर लक्ष ठेवून अकोल्यातील हॅन्डलूम्सची बाजारपेठ सज्ज झाली आहे. त्यामित्ताने अकोल्यातील ग्राहकांकडून इम्पोर्टेड साहित्यांना अधिक पसंती मिळत आहे. अहमदाबादहून मोठ्या प्रमाणात अकोल्यात साहित्य येत असून, यासाठी फोम हाऊस, छाया हॅन्डलुम्स, इंडिया, एटी कलेक्शन, न्यू इंडिया, विदर्भ, कृष्णा हॅन्डलुम्सचे नाव घेतले जाते.
*कर्टनमध्ये रंगसंगतीच्या हजारो छटा..
कर्टनमध्ये रंगसंगतीच्या हजारो छटा आल्या असून, ग्राहकांची पहिली पसंती इंम्पोर्टेड कापडांना मिळत आहे. कधीकाळी नेट, पॉलीस्टर, कॉटन, जेकॉट सिल्कचे पडदे वापरले जात असत; मात्र अलीकडे इंम्पोर्टेड पडदे बाजारात आल्याने ग्राहक त्याकडे वळले आहेत. दारांसाठी आणि खिडक्यांसाठी लागणारे पडदे अकोल्यात विक्रीसाठी उपलब्ध असून, शंभर रुपयांपासून तर पंधराशे रुपयांपर्यंत या पडद्यांची किंमत आहे.
* मेमरी आणि एचआर फोमची चलती..
कधी काळी सोफा आणि गाद्यांसांठी क्वायर-नारळाच्या दोºयाचा वापर व्हायचा; मात्र त्यानंतर रबर-डनलॉप फोम, वेस्ट फोमच्या तुकड्यांचे बॉन्डेड, बाजारात आले; मात्र अलीकडे मेमरी, एचआर आणि जेल फोमसारखे अद्यावत पर्याय उपलब्ध झाले आहेत. कधीकाळी एक हजार रुपयांत मिळणारी ३ बाय ६ ची गादी आता दहा हजारापर्यंत पोहोचली आहे.
*अपव्होलस्ट्रीचे स्वरूप बदलत चालले...
कधीकाळी सोफासेटसाठी रेग्झीन कापड आणि त्यातील प्लेन रंगांना मागणी असायची; मात्र अत्याधुनिकतेमुळे अपव्होलस्ट्रीचे स्वरूपही बदलले. रेग्झीन नंतर जूट, शनिल,लेदर, वेलवेटच्या कापडांनी ग्राहकांना आकर्षित केले. इंम्पोर्टेडमध्ये आता बाजारात स्वेड कापडाला अधिक मागणी आहे. रंगसंगतीच्या हजारो छटांना नवीन कापड ग्राहकांना आकर्षित करून घेत आहे.
- नवीन सोफसेट आणि गाद्या घेण्याऐवजी अनेक जण दोन ते पाच वर्षानंतर त्यावर मेमर आणि एचआर फोमचे स्तर बदलून नवीन पद्धतीचे कापड लावून घेतात. त्यामुळे जुने फर्निचर पुन्हा नवीन रूपात येते. इंम्पोर्टेड कापडांना ग्राहकांची अधिक पसंती मिळत आहे.
- किरण कुडुपले (गोयनका), फोम हाऊस, अकोला.