फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 04:15 AM2021-06-26T04:15:03+5:302021-06-26T04:15:03+5:30
मोलकरणींना अनेक दरवाजे बंद! अकोला : कोरोनामुळे आता मोलकरणींनासुद्धा अनेक घरांचे दरवाजे बंद झाले आहेत. घरकाम नाही, हातात पैसा ...
मोलकरणींना अनेक दरवाजे बंद!
अकोला : कोरोनामुळे आता मोलकरणींनासुद्धा अनेक घरांचे दरवाजे बंद झाले आहेत. घरकाम नाही, हातात पैसा नाही. त्यामुळे कुटुंबाचा गाडा कसा चालवावा, असा प्रश्न मोलकरणींना सतावत आहे. कोरोनामुळे अनेकांवर संकट कोसळत आहे. कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून आता लॉकडाऊन जाहीर केले आहे.
शाळांमध्ये फी भरण्याचा तगादा
अकोला : पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना वर्गोन्नती देण्याचा निर्णय झाल्यामुळे शाळांनी फी वसूल करण्याचे अभियान सुरू केले आहे. विशेषकरून खासगी व्यवस्थापनांच्या शाळांनी पालकांना फोन व इतर माध्यमांद्वारे संदेश पाठवून या वर्षीची पूर्ण फी भरण्याची विनंती करण्यात येत आहे. मुळात वर्गच न भरल्याने फी कशाची, असा पालकांचा प्रश्न आहे.
ग्रामीण भागात लसीकरणावर भर!
अकोला : कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग नियंत्रित करण्यासाठी जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोविड लसीकरणावर भर देण्यात येत आहे. जिल्हा परिषद आरोग्य विभागामार्फत जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य आणि उपकेंद्रस्तरावर लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. सुरेश आसोले यांनी सांगितले.