अकोल्याच्या भावी डॉक्टरवर अमरावतीत काळाचा घाला

By Admin | Published: September 13, 2014 01:20 AM2014-09-13T01:20:05+5:302014-09-13T01:20:05+5:30

दुचाकीच्या अपघातात दोघे ठार

The future doctor of Akola will be involved in Amravati | अकोल्याच्या भावी डॉक्टरवर अमरावतीत काळाचा घाला

अकोल्याच्या भावी डॉक्टरवर अमरावतीत काळाचा घाला

googlenewsNext

अकोला : अमरावती शहरातील पंचवटी मार्गावरील पॉवर हाऊसजवळ गुरुवारी रात्री ११.३0 वाज ताच्या सुमारास भरधाव बोलेरोने धडक दिल्याने दोन भावी डॉक्टरांचा जागीच मृत्यू झाला. यापैकी एक युवक अकोल्यातील रहिवासी आहे.
अमरावती शहरातील डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसच्या तृतीय वर्षाला शिकणारे शिशिर विलास सोनोने (२२ रा. उमरी अकोला) आणि त्याचा मित्र अनुराग राधेश्याम चो पकर (२३) हे गुरुवारी रात्री ११.३0 वाजताच्या सुमारास मोटारसायकलवर मोर्शी रोडवरील एका हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी जात असताना ट्रॅक्टरला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात विरुद्ध दिशेने येणार्‍या भरधाव बोलेरोने त्यांच्या मोटारसायकलला जबर धडक दिली. यामध्ये दुचाकीचा चुराडा होऊन शिशिर व अनुराग यांचा जागीच मृत्यू झाला.
पोलिसांनी बोलेरोचालक ओमप्रकाश कुटुमल कुकरेजा (३६) याला अटक केली. शिशिर सोनोने हा अकोल्यातील सर्जन डॉ. विलास सोनोने यांचा एककुलता एक मुलगा आहे. शिशिर हा अमरावती ये थे शिकायला होता. शुक्रवारी दुपारी शिशिरचे पार्थिव अकोल्यात आणण्यात आले. सायंकाळी उमरी मोक्षधाम येथे शोकाकुल वातावरणात शिशिरच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

** दुसर्‍या अपघात अकोल्यातील आणखी एकजण ठार, एक गंभीर


दुसरा अपघात अमरावती जिल्हय़ातील लोणीजवळ घडला. अकोला येथून लग्न सोहळ्याहून परतत असताना लोणीजवळ शुक्रवारी सकाळी साडेअकरा वाजताच्या सुमारास ट्रकने कारला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला. त्यापैकी सुरेश कोकले हे अकोल्यातील मलकापूर भागात राहणारे असल्याचे समजते. त्यांच्यासोबत असलेली एक महिला गंभीर जखमी असून, तिला नागपूर येथील रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.
मृतकांमध्ये ज्ञानदेवराव तायडे यांच्यासह सुरेश बापूराव कोकले (४५रा. मलकापूर) यांचा समावेश आहे तर पौर्णिमा सुरेश कोकले (४५), लीलाबाई बापूराव कोकले (७0) व शशीकला ज्ञानदेव तायडे (६२) गंभीर जखमी झाले. कोकले कुटुंब हे अकोल्यातील मलकापूर भागातील रहिवासी आहे; परंतु ते बाहेरठिकाणी स्थायिक झाले आहेत. कोकले कुटुंबातील लग्नसभारंभ असल्याने हे कुटुंब अकोल्यात आले होते.

Web Title: The future doctor of Akola will be involved in Amravati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.