हाता येथे ग्रा. पं. कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:41 AM2021-09-02T04:41:15+5:302021-09-02T04:41:15+5:30
वॉर्ड क्रमांक चारमध्ये शासकीय जागेत गत ३० ते ३५ वर्षांपासून नागरिक राहतात. पावसाळ्याच्या दिवसात गावातील सांडपाणी नागरिकांच्या घरात शिरत ...
वॉर्ड क्रमांक चारमध्ये शासकीय जागेत गत ३० ते ३५ वर्षांपासून नागरिक राहतात. पावसाळ्याच्या दिवसात गावातील सांडपाणी नागरिकांच्या घरात शिरत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याबाबत ग्रामस्थांनी सरपंच व सचिवांना माहिती देऊन सांडपाण्याची विल्हेवाट लावण्याची मागणी केली आहे. मात्र, याकडे दुर्लक्ष होत असल्याने अखेर ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. उपोषणात संतोष किसन दामोदर, संजय दशरथ दामोदर, सखाराम राजाराम नंदाने, भगवान महादेव सुर्वे, विजय बाबुराव दामोदर, विलास महादेव सुर्वे यांच्यासह महिलांचा सहभाग आहे. याबाबत सरपंच कविता मनसुटे यांच्याशी संवाद साधला असता जेसीबीद्वारे पाण्याची विल्हेवाट लावत असताना काही नागरिकांनी विरोध केला. आता शोषखड्डा खोदून पाण्याची विल्हेवाट लावण्यात येईल, असे सांगितले. उपोषणाला अद्याप सरपंच, सचिवांनी भेट दिली नाही. वरिष्ठांनी दखल घेऊन समस्या सोडवाव्यात, अशी मागणी उपोषणकर्त्यांनी केली आहे.