अकोटातील गजानन महाराज मंदिरात चोरी!
By admin | Published: April 13, 2017 12:51 AM2017-04-13T00:51:25+5:302017-04-13T00:51:25+5:30
अकोट- संत गजानन महाराज मंदिराचे दरवाजे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने ३५ हजार रुपये किमतीचा चांदीचा ऐवज चोरुन नेल्याची घटना १२ एप्रिल रोजी सकाळी उघडकीस आली.
अकोट : स्थानिक गजानन नगरमधील संत गजानन महाराज मंदिराचे दरवाजे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने ३५ हजार रुपये किमतीचा चांदीचा ऐवज चोरुन नेल्याची घटना १२ एप्रिल रोजी सकाळी उघडकीस आली.गजानन मंदिरातील मुख्य दरवाज्याला लावलेले कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी राम, सीता, लक्ष्मण यांच्या मूर्तीवरील तीन चांदीचे मुकूट व छत्री तसेच गजानन महाराजांच्या मूर्तीवरील चांदीची छत्री चोरुन नेली. येथून चोरीला गेलेल्या चांदीचे वजन अंदाजे १ किलो असून, त्याची किंमत ३५ हजाराच्या जवळपास आहे. मंदिराचे पुजारी दीपक कुळकर्णी हे ११ एप्रिल रोजी रात्री ९.३० वाजता मंदिरातील पूजा, आरती करून दरवाजांना कुलूप लावून मंदिराच्या वरील भागात असलेल्या खोलीत झोपले होते. १२ एप्रिल रोजी मंदिराचे कुलूप उघडण्याकरिता ते आले असता, त्यांना सदर प्रकार दिसून आला.