अवैध धंदेवाल्यांची पोलिसांवरच नजर; जुगार अड्डे व क्लब चालविणाऱ्यांनी लावले सीसी कॅमेरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2019 01:55 PM2019-02-01T13:55:29+5:302019-02-01T13:57:29+5:30
अकोला: जिल्ह्यात गत काही महिन्यांपासून अवैध धंदे मोठ्या प्रमाणात फोफावले असून, या जुगार अड्डे आणि क्लबवर पोलिसांच्या वाढत्या फेºयांवर अंकुश लावण्यासाठी अवैध धंदेवाल्यानी पोलिसांवर नजर ठेवण्यासाठी सीसी कॅ मेरे लावल्याची खात्रीलायक माहिती आहे.
- सचिन राऊत
अकोला: जिल्ह्यात गत काही महिन्यांपासून अवैध धंदे मोठ्या प्रमाणात फोफावले असून, या जुगार अड्डे आणि क्लबवर पोलिसांच्या वाढत्या फेºयांवर अंकुश लावण्यासाठी अवैध धंदेवाल्यानी पोलिसांवर नजर ठेवण्यासाठी सीसी कॅ मेरे लावल्याची खात्रीलायक माहिती आहे. या सीसी कॅमेºयांमुळे पोलिसांचे आपसातच वाद वाढले असून, धंद्यांवर ये-जा करणारे आणि ठाणेदारांना अंधारात ठेवत हप्तेखोरी करणाºयांचे चांगलेच वांधे झाले आहेत; मात्र यामुळे जुगार अड्डे अन् क्लब चालविणाºयांचे मनोबल पोलिसांपेक्षाही वाढल्याचे या प्रकारामुळे समोर येत आहे. जिल्ह्यात अवैध धंदे प्रचंड फोफावले असून, याकडे पोलिसांकडून कानाडोळा केल्या जात आहे. गत काही महिन्यांपासून हे अवैध धंदे जोरात सुरू असून, शहरासह जिल्ह्यातील काही पोलीस ठाण्यांच्या हद्दीत धुमाकूळ सुरू आहे. जुगार अड्ड्यावर छापेमारी केल्यानंतर तीन ते चार ठिकाणावर पोलिसांनाच ताब्यात घेण्यात आले होते; मात्र खात्याची प्रतिमा मलीन होऊ नये म्हणून त्यांना सोडण्यात आल्याची चर्चाही जोरात आहे.
पोलीस अधीक्षकांनी दिले होते निर्देश
डाबकी रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन जणांचे मोठे जुगार अड्डे अन् क्लब सुरू आहेत. प्रचंड तक्रारी झाल्यानंतर पोलीस अधीक्षकांनी पोलीस ठाणे गाठून सदरचे धंदे बंद करण्याच्या सूचना केल्या होत्या; मात्र त्यानंतरही सदरचे अवैध धंदे जोरात सुरू असून, पोलिसांच्या हप्तेखोरीमुळेच अवैध धंदे व क्लब चालविणाºयांनी सीसी कॅमेरे लावून त्यांच्यावरच नजर ठेवण्यासाठी धाडस केल्याचे बोलल्या जात आहे.
अधिकाºयांचाही वसुलीदार
प्रत्येक पोलीस ठाण्यात केवळ वसुलीचे कामकाज करण्यासाठी पोलीस कर्मचाºयाची अघोषित नियुक्ती केली आहे. ठाणेदारांच्या वरिष्ठ अधिकाºयांचेही जिल्ह्यात वसुलीदार असल्याची चर्चा खात्यात जोरात आहे. एका अधिकाºयाचा तर एक वकीलच वसुलीदार असून, दोघेही मॉर्निंग वॉकच्यावेळी वसुली करीत असल्याची माहिती आहे.
माफियांच्या थेट ठाण्यात वावर
जुगार अड्डे, क्लब आणि वरली अड्डे चालविणाºयांचे धाडस प्रचंड वाढले असून, त्यांच्या दिवसाआड पोलीस ठाण्याच्या आतमध्ये वावर असल्याचे दिसून येते. पोलिसांकडून ज्यांच्यावर कारवाई केल्या जाते ते माफिया दोन तीन दिवसानंतर पुन्हा ठाण्यात येऊन बसतात, यावरून पोलिसांचे अवैध धंदेवाल्यांशी साटेलोटे असल्याचे स्पष्ट होते. अकोट फैल, डाबकी रोड, एमआयडीसी, मूर्तिजापूर, पिंजर, हिवरखेड, बोरगाव मंजू, पातूर या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत जोरात हे धंदे सुरू आहेत.