गायगाव येथे जुगारावर छापा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 04:18 AM2020-12-22T04:18:52+5:302020-12-22T04:18:52+5:30
------------------------------- सार्वजनिक स्वच्छतागृहाचा अभाव अकोट : अकोट नगर परिषदेच्या परिसरात सार्वजनिक मुत्रिघर व शौचालय नसल्याने नागरिकांची कुचंबणा होत आहे. ...
-------------------------------
सार्वजनिक स्वच्छतागृहाचा अभाव
अकोट : अकोट नगर परिषदेच्या परिसरात सार्वजनिक मुत्रिघर व शौचालय नसल्याने नागरिकांची कुचंबणा होत आहे. याकडे अकोट नगर परिषद प्रशासनाने लक्ष देऊन स्वच्छतागृहे उभारण्याची मागणी हाेत आहे.
-------------------------------
वन्य प्राण्याचा हैदाेस; शेतकरी त्रस्त!
बाळापूर: तालुक्यातील ग्रामीण भागात गत काही दिवसांपासून वन्य प्राण्यांचा हैदाेस सुरू आहे. त्यामुळे शेतकरी त्रस्त झाले असून, वन विभागाने वन्य प्राण्यांचा बंदाेबस्त करण्याची मागणी होत आहे. परिसरात रब्बी हंगामातील सर्वच पिकांचे माेठ्या प्रमाणात नुकसान करीत आहे.
--------------------------------
खासगी व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची लूट
तेल्हारा : तालुक्यात कपाशी वेचणीला सुरुवात झाल्याने शेतकऱ्यांच्या घरात कापूस येत आहे. गरज असल्याने शेतकरी खासगी व्यापाऱ्यांना कापूस विक्री करीत अहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसत आहे.
---------------------------------------
-----
झुडपांमुळे अपघाताची भीती
आगर: आगर-उगवा फाटा मार्गावर दुतर्फा झाडे मोठ्या प्रमाणात वाढली आहेत. या झाडांच्या फांद्या रस्त्यावर येत आहेत. त्यामुळे आधीच अरुंद असलेल्या या रस्त्यावर चालकाचे नियंत्रण सुटून अपघात घडण्याची भीती असून, ही झाडे तोडण्याबाबत बांधकाम विभाग उदासीन आहे.
---------
वन्य प्राण्यांचा हैदोस; पिकांचे नुकसान
अडगाव: यंदा परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील पेरणी आटोपत आली असून, आता रब्बी पीक बहरत असताना वन्य प्राण्यांनी हैदोस घालत या पिकांची नासाडी सुरू केल्याने ही पिके संकटात सापडल्यामुळे शेतकरी पुरते हैराण झाले आहेत.
-----------------------------------------------
वीज पुरवठा खंडित; नागरिक त्रस्त!
सायखेड: बार्शीटाकळी तालुक्यातील ग्रामीण भागात विद्युत पुरवठ्यात वारंवार व्यत्यय निर्माण होत आहे. वीज पुरवठा खंडित होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत, तसेच कृषी पंपांचाही वीज पुरवठा विस्कळीत झाल्याने शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे रब्बी हंगाम धोक्यात सापडला आहे.
----------------------
पथदिव्यांची दुरुस्ती करण्याची मागणी
निहिदा: बार्शीटाकळी तालुक्यातील निहिदा परिसरातील लखमापूर, सावरखेड, निहिदा, पिंजर या गावांमध्ये पथदिवे बंद आहेत, त्यामुळे संबंधित परिसरात रात्रीच्या वेळी अंधारात ग्रामस्थांना अडचणी येतात. ही बाब लक्षात घेऊन गावातील काही ठिकाणचे नादुरुस्त असलेले पथदिवे विनाविलंब दुरुस्त करण्याची मागणी होत आहे.
----------------------------------------------
नांदखेड- खिरपुरी रस्त्याची दुरवस्था
वाडेगाव: नांदखेड ते खिरपुरी या रस्त्याची अतिशय दुरवस्था झाली आहे. रस्त्यावर जागोजागी पडलेले खड्डे असून, खड्डे अपघातास निमंत्रण देत आहेत. या रस्त्यावरून वाहनचालकांना प्रवास करताना कसरत करावी लागत आहे. त्यामुळे हा रस्ता त्वरित दुरुस्त करण्यात यावा, मागणी ग्रामस्थ करीत आहेत.
-------------------------------
स्वच्छता अभियान राबवून गाडगेबाबांना अभिवादन
मूर्तिजापूर: स्वच्छता अभियान आणि प्रकाशवाट प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने प्रकाश वाट प्रकल्प ग्रंथालय परिसरात स्वच्छता अभियान राबवून गाडगेबाबा यांना अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी ग्रामीण पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष विलास नसले, विलास वानखडे, रोहित सोळंके, रावसाहेब अभ्यंकर, अमोल तातुरकर, ज्ञानेश टाले, विजय देवके, इब्राहिम अली, विद्युत अभियंता इंगळे, मेहूल दोशी व प्रकाशवाट प्रकल्प तसेच स्वच्छता अभियानाचे सदस्य उपस्थित होते. (फोटो)