जुगार अड्ड्यावर छापा, सात जणांना अटक
By admin | Published: April 21, 2017 01:49 AM2017-04-21T01:49:23+5:302017-04-21T01:49:23+5:30
अकोला : पोलीस मुख्यालयासमोरील कमला नेहरू नगरातील जुगार अड्ड्यावर पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांच्या विशेष पथकाने छापा घालून सात जणांना अटक केली.
सहा लाख ६४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
अकोला : पोलीस मुख्यालयासमोरील कमला नेहरू नगरातील जुगार अड्ड्यावर पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांच्या विशेष पथकाने छापा घालून सात जणांना अटक केली. ही कारवाई गुरुवारी दुपारी करण्यात आली. पोलिसांनी एकूण ६ लाख ६४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक हर्षराज अळसपुरे यांना कमला नेहरू नगरात जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यांनी गुरुवारी दुपारी जुगार अड्ड्यावर छापा घातला. यावेळी जुगार खेळणारे संदीप तेजराव तायडे (३८ रा. वाशिम बायपास), मोहम्मद शोएब मोहम्मद शकूर (३० रा. अकोट फैल), राजेश रामकृष्ण इंगळे (५० रा. एमराल्ड कॉलनी), सुरेश नथ्थुसा गोलाईत (६८ रा. पोलीस मुख्यालयासमोर), अरुण यादवराव देशमुख (५६ रा. वाडेगाव), प्रमोद वामनराव गावंडे (३९ रा. हरिहरपेठ), विजय किशन काळे (३५ रा. गीता नगर) यांना अटक केली. त्यांच्याकडून १९ मोटारसायकल, पाच मोबाइल आणि रोख असा एकूण ६ लाख ६४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.