रुईखेड येथून गांजा जप्त, दोघांना अटक
By admin | Published: June 24, 2016 12:32 AM2016-06-24T00:32:10+5:302016-06-24T00:32:10+5:30
आकोट तालुक्यातील घटना; गोळ्या-बिस्कीटच्या टपरीमध्ये होत होती गांजाची विक्री.
आकोट (जि. अकोला): तालुक्यातील रुईखेड येथे गांजाची विक्री करणारी महिला व गांजा पुरविणार्या एका इसमाविरुद्ध आकोट ग्रामीण पोलिसांनी कारवाई केली. पोलिसांनी दोघांना अटक करून त्यांच्याजवळून १२४२ रुपयांचा गांजा जप्त केला आहे. ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रुईखेड येथे गांजाची विक्री होत असल्याची माहिती आकोट ग्रामीण पोलिसांना मिळाली. त्यावरून पोलिसांनी २३ जून रोजी सकाळच्या सुमारास तेथे धाड टाकली असता, कांताबाई तुळशीराम झापे (५0) ही तिच्या गोळ्या-बिस्कीटच्या टपरीमध्ये गांजाची विक्री करताना आढळून आली. तिच्याकडून १२४२ रुपये किमतीचा २१ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे. तिला जामीन शाह खलील शाह (३0 रा. अंजनगाव सुर्जी) हा गांजा पुरवित असल्याचे आढळून झाले. पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब नाईक यांच्या फिर्यादीवरून उपरोक्त दोन्ही आरोपींविरुद्ध एनडीपीएस अँक्टच्या कलम ८, २0 व २२ अन्वये गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. अधिक तपास ठाणेदार सतीश पाटील