गांधीधाम-पूरी एक्स्प्रेस रद्द, पुरी-अहमदाबाद एक्स्प्रेसचा मार्ग बदलला
By Atul.jaiswal | Published: September 5, 2022 05:54 PM2022-09-05T17:54:56+5:302022-09-05T17:55:16+5:30
७ व १० सप्टेंबर रोजीच्या अप व डाऊन फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.
अकोला : दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या रायपूर मंडळ अंतर्गत लखोली ते रायपूर दरम्यान दुसऱ्या लाईनचे काम, मंदिर हसौद रेल्वे स्थनकावरील यार्ड आधुनिकिकरण व लखोली-मंदीर हसौद या स्थानकांदरम्यान नया रायपूर रेल्वे स्थानकाचे निर्माण कार्य व लखोली ते रायपूर दरम्यान रेल्वे लाईनचे विद्युतीकरण या कामांसाठी मेगा ब्लॉक घेण्यात येणार असल्याने पुरी-अहमदाबाद एक्स्प्रसेसह चार गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आला आहे, तर गांधीधाम-पुरी एक्स्प्रेसच्या ७ व १० सप्टेंबर रोजीच्या अप व डाऊन फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.
या सर्व गाड्या अकोला स्थानकावरून जाणाऱ्या असल्यामुळे अकोलेकर प्रवाशांना त्रास सहन करावा लागणार आहे.मध्य रेल्वेच्या भूसावळ मंडळ प्रबंधक कार्यालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, दक्षिण मध्य पूर्व रेल्वेच्या मेगा ब्लॉकमुळे २२९७३ गांधीधाम-पूरी एक्स्प्रेस ७ सप्टेंबर रोजी रद्द करण्यात आली आहे. तर २२९७४ पूरी-गांधीधाम एक्स्प्रेस १० सप्टेंबर रोजी रद्द करण्यात आली आहे.
या गाड्यांच्या मार्गात बदल
६, ८, ९, १०, १३ व १५ सप्टेंबर रोजी पुरी येथून सुटणारी १२८४३ पुरी-अहमदाबाद एक्स्प्रेस ही गाडी टिटलागढ़- संबलपुर-झारसुगुड़ा-बिलासपुर-रायपुर या परिवर्तित मार्गाने धावणार आहे.
८,१०,११,१२ व १५ सप्टेंबर रोजी अहमदाबाद येथून सुटणारी १२८४४ अहमदाबाद-पुरी एक्स्प्रेस ही गाडी रायपुर-बिलासपुर-झारसुगुडा-संबलपुर-टिटलागढ़ या परिवर्तित मार्गाने धावणार आहे. याशिवाय २०८६१ पुरी-अहमदाबाद व २०८६२ अहमदाबाद-पुरी या गाड्याही परिवर्तित मार्गाने धावणार आहेत.